ओशाे - गीता-दर्शन

11 Oct 2025 14:57:07
 

Osho 
 
नवी पत्नी शाेधण्याआधी मी तुम्हाला ठीकठाक करावं. कारण अशा रड्नया अवस्थेत नवी पत्नी शाेधणं फार अवघड!’ ते म्हणाले, ‘आपण काय बाेलताहात? माझी पत्नी वारली आहे...’ मी त्यांना म्हणालाे, ‘प्रामाणिकपणे जरा स्वतःला विचारा बरं, नव्या पत्नीची शाेधाशाेध चालू झाली आहे की नाही ते!’ त्यावर ते म्हणाले, ‘पण हे आपणास कसं कळलं?’ मी म्हटले, ‘मला काही खास कळलं अशातला भाग नाही; पण माणसाचं मन मी जाणताे. तुमच्याबाबत खांस वेगळं असं काही मी सांगत नाहीये. लवकरच तुम्ही नवी पत्नी हुडकाल. मग म्हणाल, ‘आता मी मजेत आहे, आता धर्माची काय जरूर?’ धर्म तुमचं उपकरण बनू शकत नाही. धर्म म्हणजे काही इमर्जन्सी मेझर नाही.
 
आपत्कालीन उपाययाेजना नाही की संकट आल्याबराेबर दरवाजा उघडला धर्माचा आणि तुम्ही आत गेलात... आणि तिकडे दुःखातून सुटका हाेण्यासाठी धर्म ही उपाययाेजना नाही. जर बराेबर समजलात तर धर्म हा सुखापासून सुटकेचा उपाय आहे. त्यासाठी तर मन कधी तयार हाेत नाही. म्हणून तर जीवनात धर्म कधी येत नाही.अन् लक्षात ठेवा की जाे सुखातून मु्नत हाेताे, ताे दुःखातून तत्काळ मु्नत हाेताे आणि जाे दुःखापासून सुटू इच्छिताे; पण सुख मिळवू इच्छिताे, त्याची दुःखापासून कधीही सुटका हाेत नसते. कारण सुखापासून ताे मु्नत नसताे. दुःख हा सुखाचा अनिवार्य पैलू आहे. दुःख साेडायची आपली तयारी आहे. पण आपण त्यातून मु्नत हाेऊ शकत नाही. कारण सुख साेडायची आपली तयारी नाहीये. म्हणून मी आपणास असे सांगू इच्छिताे की, सुखातील ्नलेश समजून घ्या.
Powered By Sangraha 9.0