व्हिक्टाेरिया अँड अल्बर्टच्या संचालकांची साताऱ्यातील ऐतिहासिक संग्रहालयास भेट

11 Oct 2025 14:53:15
 

Albert 
 
लंडनच्या व्हिक्टाेरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या कलेक्शन केअर अँड अँक्सेस विभागाच्या संचालिका कँथरीन पारसन्स यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट दिली. येथील ऐतिहासिक वस्तू व त्यांच्या संवर्धनाचे काम पाहून त्यांनी समाधान व्य्नत केले. संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी पारसन्स यांचे स्वागत केले. पारसन्स यांनी संग्रहालयातील विविध दालनांना भेटी देतानाच त्यांची तपशीलवार माहिती जाणून घेतली. अभिरक्षक शिंदे यांनी दालन, महत्त्वाच्या व ऐतिहासिक कलाकृती; तसेच दुर्मीळ वस्तूंच्या संग्रहाची माहिती दिली. संग्रहालय व्यवस्थापनाने ऐतिहासिक ठेव्याच्या जतनासाठी केलेले प्रयत्न पाहून पारसन्स प्रभावित झाल्या. या कामाची त्यांनी प्रशंसा केली. संग्रहालयाच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असणारी लंडनच्या व्हिक्टाेरिया अँड अल्बर्ट म्युझियमधील वाघनखे 19 जुलै 2024 राेजी साताऱ्यात दाखल झाली हाेती. सात महिन्यांनंतर ती नागपूरला व त्यानंतर 30 सप्टेंबरला काेल्हापूर येथील लक्ष्मीनिवास संग्रहालयात विसावली. ही वाघनखे सुखरूप, काेल्हापूरपर्यंत पाेहाेचवण्यासाठी पारसन्स आल्या हाेत्या.
 
Powered By Sangraha 9.0