आपदा में भी मिल गयाअवसर!

01 Oct 2025 12:24:53
 
 
sports
 
आपदा में अवसर म्हणजे संकटात संधी. पुमा या जगप्रसिद्ध शूज कंपनीवर 2024 साली अनपेक्षित संकट ओढवलं हाेतं. प्रीमियर लीग फुटबाॅलच्या सामन्यांमध्ये चेल्सीचा स्टार मार्क कुकुरेला दाेन वेळा घसरला आणि त्या दाेन्ही वेळा प्रतिस्पर्धी संघांनी चेल्सीवर गाेल चढवले. मार्क इतका भडकला की त्याने पायातले पुमाचे 220 पाैंड किंमतीचे शूज काढले आणि ते कचऱ्याच्या डब्यात टाकले. तसा फाेटाे काढला आणि साेशल मीडियावर टाकला. आता मार्क आणि त्याची टीम हे खरंतर पुमाचे ब्रँड अँबॅसेडर. पण, संतापाच्या भरात मार्कने केलेल्या कृत्यामुळे पुमाने त्याच्यावर काही कारवाई केली असती, तर त्यातून पुमाचीच बदनामी झाली असती.
 
मार्कच्या संतापाचं कारण जगजाहीर हाेतं, सगळ्यांनी पाहिलेलं हाेतं. दुर्लक्षही करता येणार नव्हतं. मग करायचं काय? अवघ्या 24 तासांत त्यांच्या मार्केटिंग टीमने एक ब्रिलियंट आयडिया काढली. जिथे फरशी किंवा जमीन ओली असते तिथे पिवळ्या रंगाचा एक बाेर्ड ठेवलेला असताे, त्यावर वेट फ्लाेअर अशी सूचना लिहिलेली असते. पुमाने त्या फलकावर घसरणाऱ्या माणसाला कुकुरेलाच्या आफ्रिकन केशसंभाराची जाेड दिली आणि खाली ओळ लिहिली, तुम्ही घसरून पडता कसे, ते महत्त्वाचं नाही, तुम्ही पुन्हा उभे कसे राहता, ते महत्त्वाचं आहे. गेम पूर्णपणे फिरला!
 
Powered By Sangraha 9.0