बुद्ध म्हणतात की, ‘मृत्यू येत आहे म्हणजे जाे हाेता ताे राहीलच, जाे नव्हता ताेच जाईल. म्हणून तू व्यर्थ दु:खी हाेऊ नकाेस. जाे नव्हता ताे आहे असे आपणास फ्नत वाटत हाेते. नसलेल्यालाच मृत्यू नाहीसे करू शकताे. ताे फ्नत एक स्वप्न हाेता, आपली ती फ्नत धारणा हाेती, त्याचे अस्तित्व नव्हते. ताे फ्नत एक विचार हाेता. प्रत्यक्षात ज्याची काही श्नयताही नव्हती, ताेच संपून जाईल. जाे नव्हता ताेच संपेल, ज्याला अस्तित्वच नव्हते आणि जाे हाेता त्याच्या संपण्याचा काही प्रश्नच नाही, जाे आहे, ताे कायम राहीलच! मृत्यू तर येत आहे पण बुद्ध मृत्यूकडे वेगळ्या तऱ्हेने पाहतात. मी मरणार अशा तऱ्हेने ते पाहत नाहीत. ते हे पाहतात की जे तत्त्व मरू शकते ते मेलेलं आहेच, तेच मरेल. ते स्वत:ला दूर असे करू शकतात, तटस्थ हाेऊ शकतात. मृत्यूची नदी वाहून जाईल. बुद्ध तीरावर उभे राहतील-त्या प्रवाहापासून अलग, बाहेर, व्यथाही येते, दु:खही येते, सर्व येत राहील.
रात्रही येईल अन् सकाळही येईल. या पृथ्वीवर आपण ज्ञानाला उपलब्ध झालात, तर त्यामुळे रात्र उजळली जाणार नाही, दु:खाचे सुख नाही हाेणार. आपण ज्ञानाला उपलब्ध झालात तरी काटा पायाला बाेचेलच. ताे फुलासारखा वाटणार नाही, काट्यासारखाच वाटेल. मग फरक कशात असेल?आतील चेतना डळमळते केव्हा? पायात काटा घुसताे तेव्हा? नाही, जेव्हा आतील चेतना असे मानते की, काटा मला बाेचला, तेव्हा. जर आतील चेतना काट्याच्या बाेचण्याच्या पार राहील तर ती अनुद्विग्न राहील. अशी चेतना अस्पर्शित, अनटच्ड् बाहेरच राहते.असे बाहेर राहण्याची कला म्हणजेच याेग आहे. या बाहेर राहण्याच्या कलेबद्दलच कृष्ण सांगत आहे. अशा स्थिर झालेल्या चेतनेतच, वाऱ्याच्या झाेतांनी जिच्यात काहीही कंप हाेत नाही अशा ज्याेतीसारख्या चेतनेतच अस्तित्वाची परमसत्ता विराजमान हाेते. ती तिथे विराजमान आहेच. पण अशा ज्याेतिर्मय हाेण्यानं फ्नत त्या सत्तेच्या मंदिराचे दरवाजे उघडतात.