बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी साेनिया सेठी यांची राज्य सरकारने नियु्नती केली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास निवृत्त झाल्यानंतर अंतरिम व्यवस्था म्हणून आशिष शर्मा यांच्याकडे बेस्टचा तात्पुरता कार्यभार साेपविण्यात आला हाेता. आता पूर्णवेळ महाव्यवस्थापक म्हणून सेठी यांच्याकडे पदभार साेपवण्यात आला आहे.राज्यात अतिवृष्टीमुळे माेठे नुकसान झाले असताना मदतकार्यात मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अतिर्नित मुख्य सचिव सेठी महत्त्वाची भूमिका बजावत हाेत्या. आता त्यांची या पदावर नियु्नती करण्यात आली आहे.काही महिन्यांपासून बेस्टला पूर्णवेळ महाव्यवस्थापक नव्हते. अनिल डिग्गीकर यांच्यानंतर बेस्टच्या महाव्यस्थापकपदाचा अतिर्नित कार्यभार हाेता. नंतर एस.व्ही. आर. श्रीनिवास आणि आशिष शर्मा यांच्याकडे हा पदभार हाेता. आता सेठी यांच्या नियु्नतीमुळे बेस्टला पूर्णवेळ महाव्यस्थापक मिळाले आहेत.