बेकायदा अ‍ॅपआधारित सेवांवर कारवाईची माेहीम

01 Oct 2025 12:24:08
 

App 
 
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार अ‍ॅपआधारित वाहनचालकांनी नियमांचे पालन न केल्यास कठाेर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभाग आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) विशेष माेहीम हाती घेतली असून, गेल्या काही दिवसांत अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या 263 वाहनांवर 3.88 लाखांचा दंड ठाेठावण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. शासनाच्या निर्णयानुसार अ‍ॅपबेस्ड वाहने चालवण्यासाठी चालकांकडे वैध परवाना असणे; तसेच चालकांना भाड्याच्या रकमेपैकी 80 ट्नके भाडे देणे बंधनकारक असून, प्रवाशांकडून ठरलेल्या दरापेक्षा कमी-जास्त भाडे आकारता येणार नाही, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
 
मुंबईत अनेक अ‍ॅपआधारित वाहने प्रवाशांकडून मनमानी भाडे वसूल करत असल्याच्या तक्रारींनंतर परिवहन विभागाने थेट कारवाईचा बडगा उगारला. शासनान ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच प्रवाशांकडून भाडे आकारावे; परंतु काही चालक विनापरवाना तसेच अतिर्नित शुल्क आकारत असल्याचे आढळून आले. अशा चालकांवर कारवाईसाठी आझाद मैदान पाेलीस ठाणे, सांताक्रूझ ठाणे आणि अंधेरी ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलेले आहेत.
Powered By Sangraha 9.0