काेकणातील कातळशिल्प जतनासाठी एमटीडीसी-निसर्गयात्री संस्थेमध्ये करार

01 Oct 2025 12:16:11
 

agree 
 
जागतिक पर्यटन दिनानिमित्त काेकणातील अश्मयुगीन कातळशिल्प जतन, संवर्धन; तसेच प्रचार, प्रसार आणि प्रसिद्धीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), राज्य शासन आणि निसर्गयात्री संस्था (रत्नागिरी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. संयु्नत राष्ट्र पर्यटन संस्थेंतर्गत त्यांनी दिलेले घाेषवाक्य पर्यटन आणि शाश्वत विकासास अधीन राहून कार्यक्रम आयाेजिण्यात आला हाेता. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून एमटीडीसीमार्फत प्रधान कार्यालय व संलग्नित सर्व प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवासांत विविध कार्यक्रम आयाेजिण्यात आले.एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांनी रत्नागिरीस्थित काेकणातील कातळशिल्प आणि वारसा संशाेधन केंद्रास भेट दिली.त्यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपतीपुळ्यात झालेल्या कार्यक्रमात निसर्गयात्री संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष तसेच काेकणातील कातळशिल्प शाेधकर्ते व अभ्यासक सुधीर रिसबूड आणि एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक माने यांच्या स्वाक्षरीने हा सामंजस्य करार करण्यात आला. काेकणातील कातळशिल्पांना युनस्काेचा जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.काेकणातील पर्यटनवाढीस आणि काेकणच्या विकासात हा करार महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्य्नत करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0