सलमान खानला फिल्म इंडस्ट्रीतच नाही तर इतरत्रही भाई म्हणून मान आहे, त्याची काही कारणं आहेत. असं म्हणतात की ताे त्याच्या कमाईतला फार छाेटा हिस्सा स्वत:साठी वापरताे आणि बाकीच्यातून दानधर्म करताे, अनेकांना आधार देताे, मदत करताे, अनेक आयुष्यांच्या उभारणीला मदत करताे. त्याची फारशी वाच्यता केली जात नाही. कधी कधी त्यातले काही किस्से, ज्यांना मदत मिळाली, त्यांच्याकडून पुढे येतात.पूजा डडवाल या नावावरून सिनेरसिकांना काही आठवणं कठीण आहे. हा फाेटाे पाहिल्यावरही फारसं काही क्लिक हाेणार नाही. वीरगती या सिनेमात ही सलमान खानची सहकलाकार हाेती.
म्हणजे त्याची नायिकाही नव्हती, अतुल अग्निहाेत्रीची नायिका हाेती. ताे सिनेमा फारसा चालला नाही. त्यानंतर पूजा डडवालचं करिअरही काही फार चाललं नाही. तिने लग्न केलं. दरम्यानच्या काळात तिला क्षयराेगाने ग्रासलं, तिला टीबी झालाय म्हटल्यावर तिच्या कुटुंबानेही तिची साथ साेडली, तिला वाऱ्यावर साेडलं. सरकारी हाॅस्पिटलमध्ये ती मरणासन्न अवस्थेत आहे, हे सलमानपर्यंत पाेहाेचलं. तात्काळ त्याने काही कपडे आणि काही भेटवस्तू पाठवल्या आपल्या टीममार्फत. ताबडताेब पूजाला सरकारी हाॅस्पिटलमधून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावरच्या उपचारांचा सगळा खर्च सलमानने केला. आता पूजा खडखडीत बरी झाली आहे आणि काम शाेधते आहे.