प्रवाशांना खूशखबर : मुंबई-पुणे प्रवासात 30 मिनिटांची बचत हाेणार

    09-Jan-2025
Total Views |
 
 
 
 


road
 
 
मुंबई-पुणे ए्नस्प्रेस हाय-वेवर हाेत असलेल्या लिंक राेडचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. बाकी काम लवकरच पूर्ण हाेऊन जूनमध्ये हा रस्ता वाहतुकीसाठी खुला हाेणार असून, यामुळे पुणे-मुंबई प्रवासात 30 मिनिटांची बचत हाेणार आहे.राज्यातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांचे काम माेठ्या प्रमाणात चालू आहे. यामुळे आगामी वर्षात वाहतूककाेंडीची समस्या तर सुटणार आहेच; पण त्याचबराेबर अनेक शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी हाेऊन वेळही वाचणार आहे. मुंबई-पुणे ए्नसप्रेस हाय- वेवर सातत्याने हाेत असलेल्या वाहतुकीच्या काेंडीने प्रवासी त्रस्त हाेत आहेत. यावर उपाय म्हणून हाय-वे वर लिंक राेडचे काम सुरू करण्यात आले आहे.लाेणावळा शहराबाहेरून ए्नसप्रेस हाय-वेला समांतर लिंक राेड बनवण्यात येत आहे.
 
ज्याचा फायदा लाखाे प्रवाशांना हाेणार आहे. पुणे-मुंबई हे 160 कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी सध्या सुमारे चार तास लागतात. आता हे अंतर 30 मिनिटांनी कमी हाेणार आहे. खाेपाेली ए्निझटपासून कुसगाव सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंतचा रस्ता टाळून जाता येणार आहे.13.3 कि. मी.च्या या रस्त्यावर 8.9 कि. मी. रस्ता घाटातून जाताे आणि 1.7 कि. मी. चा एक बाेगदा आहे. यावर दाेन केबल ब्रिज आहेत.नवी मुंबई एअरपाेर्टपासून पुणे अंतर 120 कि.मी.आहे. जे या लिंकराेडमुळे घटणार आहे. याचाही फायदा प्रवाशांना हाेणार आहे. 6595 काेटी रुपये खर्च असणाऱ्या या प्रकल्पामध्ये खाेपाेली ते कुसगाव मार्ग शून्य अपघात क्षेत्र करण्यात आले आहे. येथे वाहतूककाेंडीची समस्या देखील राहणार नाही.2019मध्ये सुरू केलेले लिंक राेडचे काम 2022मध्ये पूर्ण हाेणे अवश्यक हाेते. काेराेना काळात हे काम अडकले हाेते, त्यानंतर आता जून 2025मध्ये ते पूर्ण हाेत आहे.