थंड पाणी पिणे आणि आयुर्वेद

    30-Jan-2025
Total Views |
 
 
 
water
हिवाळ्यात थंड पाण्यामुळे कफ व वात दाेषाचा प्रकाेप वाढताे. कफ दाेषामुळे नाक, घसा, व फुफ्फुसात कफ साठताे.ज्यामुळे श्वास घेण्यस त्रास हाेऊ शकताे. थंड पाण्यामुळे पडसे, खाेकला आणि घशात खवखव अशा समस्या हाेऊ शकतात आणि त्या बऱ्या हाेण्यासही वेळ लागताे.एवढेच नव्हे तर वातदाेषामुळे त्वचेत रुक्षपणा, सांधेदुखी व स्नायू जखडण्याचा धाेकाही वाढताे.
 
काेमट पाणी : काेमट पाणी हलके व सुपाच्य असते.जे पाचक अग्नीला सशक्त बनवते.असे पाणी पाेट साफ करण्यास उपयुक्त असते आणि पचनतंत्रासाठी अत्यंत लाभदायक असते.अन्नाच्या शाेषणास मदत मिळते व बद्धकाेष्ठता दूर हाेते. पण काेमट पाणी जेवणाच्या एक तास आधी प्यावे. रिकाम्या पाेटी काेमट पाणी पिऊ शकता.
 
गरम पाणी : कढत गरम पाणी कघीही जास्त (एक कपापेक्षा जास्त) पिऊ नये. असे पाणी चहाप्रमाणे घाेट घाेट घेत प्यावे.गरम पाणी शरीरातून विषारी घटक बाहेर काढते. असे पाणी त्यांच्यासाठी उत्तम असते ज्यांची पचनशक्ती कमजाेर असते आणि कफदाेष असताे.ज्यांना कफप्रधान व्याधी म्हणजेच नाक, घसा व फुफ्फुसांशी संबंधित समस्या असतात, लठ्ठपणाने ग्रस्त आहेत वा सांधे दुखत असतील त्यांनी गरम पाणी प्यावे. पाण्यात आले, जिरे व बडीशेपही मिसळू शकता. पण नेहमी कढत गरम पाणी वा काढा पिणे बद्धकाेष्ठता वाढवू शकते. जेवण करताना अर्धा कप गरम पाणी प्याल्यामुळे अन्न लवकर पचते.