भीषण नैसर्गिक आपत्तीला ताेंड देण्यास आपण सज्ज आहात काय?

    30-Jan-2025
Total Views |
 
 


disaster
 
 
 
ट्रेकिंगला गेल्यावर किंवा प्रवासातदेखील इमर्जन्सी किटची गरज भासते. काही व्यक्ती असे इमर्जन्सी किट घरात आणि कारमध्ये देखील ठेवत असल्याचे दिसून आले आहे.आवश्यक वस्तू व्यवस्थित भरलेले हे किट तुम्हाला किमान 72 तास जिवंत राहण्यासाठी उपयु्नत ठरू शकते, असे अमेरिकेतील फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने म्हटले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही 72 तास तग धरून राहण्यासाठीच्या दृष्टीने पुढील काही गाेष्टी तुमच्या किटमध्ये असल्या पाहिजेत.राेख पैसे जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा बहुतेक वेळा वीज गायब हाेते. इंटरनेट सेवा विस्कळीत हाेते. अशा स्थितीत क्रेडिट कार्डचा वापर करणे श्नय हाेत नाही, किंवा फाेनचे नेटवर्क देखील चालत नाही. त्यामुळे घरात राेख रक्कम असणे अतिशय आवश्यक ठरते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या आणि प्रवासखर्चाच्या दृष्टीने किमान तीन दिवस पुरेल एवढी राेख रक्कम घरात ठेवा.
 
खराब न हाेणारे अन्नपदार्थ आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याबराेबर खराब न हाेणारे अन्नपदार्थ किमान तीन दिवस पुरतील एवढ्या प्रमाणात असले पाहिजेत. त्यामध्ये तुम्ही सुकामेवा, प्राेटीन बार्स, चाॅकलेट्स, बिस्किटे, टाेस्ट, लाेणचे, चटणी, जाम असे पदार्थ स्वतःसाेबत ठेवू शकता. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत किमान तीन दिवस अन्न शिजवण्यासारखी परिस्थिती नसेल किंवा ताजे अन्नपदार्थ उपलब्ध झाले नाही, तरीसुद्धा शरीराची कॅलरीची गरज भागेल एवढे अन्नपदार्थ स्वतः साेबत राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे.पिण्यासाठी स्वच्छ पाणी जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळणे देखील मुश्कील हाेते. त्यामुळे राेज एका व्यक्तीला पिण्यासाठी किती पाणी लागते याचा हिशेब धरून किमान तीन दिवस पिण्यासाठी पाणी पुरेल एवढा पाण्याचा साठा घरात असावा.
 
असा पाणीसाठा बराेबर घेण्यासाठी आता घडीच्या पिशव्या देखील बाजारात उपलब्ध असतात. पर्सनल फिल्टर वाॅटर बराेबर असेल तर नदीचे किंवा जवळच्या प्रवाहाचे पाणी स्वच्छ करून पिण्यासाठी उपलब्ध करता येते.वैद्यकीय गरजेच्या वस्तू तुम्हाला राेज बीपी आणि डायबिटीसच्या गाेळ्या घ्याव्या लागत असतील, तर त्या तुमच्यासाेबत पुरेशा प्रमाणात असाव्यात.कारण अशा आपत्कालीन परिस्थितीत अनेकदा औषधाची दुकाने देखील बंद राहू शकतात किंवा त्या दुकानांपर्यंत पाेहाेचणे श्नय हाेत नाही. बराेबर एक जादा चष्मा साेबत असणे उपयुक्त ठरते.प्रथमाेपचार पेटी अगदी लहान प्लॅस्टिकच्या डब्यात प्रथमाेपचारासाठी आवश्यक वस्तू ठेवाव्यात. त्यामध्ये उलटी-मळमळ, पित्त, डाेकेदुखी राेखणाऱ्या गाेळ्या तसेच जखम झाल्यास बँडेज, सांधेदुखी, पाय मुरगळल्यास पेन किलर स्प्रे अशा गाेष्टी त्यामध्ये ठेवाव्यात.