मधमाशी पालनातून मध गाेळा करून कमाई करणे तर सामान्य गाेष्ट आहे.पण, महाराष्ट्रातील धाराशिवमध्ये परांडा तालु्नयातील कृषी पदवीधर तेजस लिमकर यांनी नवीन पद्धत शाेधली आहे. त्यांनी मधमाशीचे विष काढून ते विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. एका महिन्याच्या आतच त्यांनी 3 ग्रॅम विष एकत्र करून एका औषध कंपनीला विकले आहे. पहिल्याच ऑर्डरमध्ये प्रतिग्रॅम विषाला 5 हजार रुपयांचा रेट मिळाला आहे. या विषाचा वापर सांधेदुखी, संधिवात, पाठीच्या कण्याचा आजार यासह विविध राेगांच्या इलाजासाठी केला जाताे.तेजस लिमकर यांनी कृषीमध्ये डिग्री घेतल्यानंतर ते मधमाशी पालनाच्या दिशेला वळाले. त्यांनी बाकीच्या लाेकांप्रमाणे मध विकण्यापासूनच सुरुवात केली.
पण,नंतर त्यांना वाटले की, मधमाशीचे विष मधापेक्षा जात माैल्यवान आहे. म्हणून ते हा व्यवसाय करण्यासाठी मधमाशीच्या विषावर संशाेधन करण्यासाठी पुण्यात पाेहाेचले. त्यांनी दिल्लीतून मधमाशीचे विष एकत्र करण्यासाठी एक कले्नटर डिव्हाइस आणला. विष एकत्र करण्याचे काम सुरू करताना त्यांना गुजरातच्या एका औषध कंपनीकडून पहिली ऑर्डर मिळाली. तेजस यांच्यासांगण्यानुसार, मधमाशीच्या विषाला मार्केटमध्ये चांगली मागणी आहे. ते त्याचा आणखी विस्तार करतील.असे काढले जाते विष मधमाशीच्या विषाचा उपयाेग शरीरातील वेदना, संधिवात, पाठीचा कणा आणि स्नायूंचे आजार, मेंदूतील आजारांसाठी केला जाताे. औषध कंपन्यांच्या वतीने मधमाशीच्या विषाला मागणी आहे.
दिल्लीतून 13 हजार रुपयांचे उपकरण आणून तीन ग्रॅम विष एकत्र केले. 5 हजार रुपयांचा रेट मिळाला. काचेच्या डिव्हाइसमध्ये 9 व्हाेल्टचा करंट साेडला जाताे. मधमाश्या उपकरणावर बसतात. जेव्हा करंट येताे तेव्हा मधमाश्या आपला बचाव करण्यासाठी डंख मारतात. काचेवर विष पडते. त्यामुळे मधमाशीचा डंक (नांगी) तुटत नाही.10 हजार मधमाश्यांपासून केवळ 1 ग्रॅम विष मिळते विष एकत्रित करण्यासाठी तेजस यांनी मधमाश्यांच्या युराेपीय प्रजातीची निवड केली आहे. उपकरणाला मधमाशीच्या पाेळ्याच्या बाजूला ठेवले जाते आणि विष एकत्र केले जाते. 10 हजार मधमाश्यांनी डंख मारल्यानंतर 1 ग्रॅम विष मिळते. हे उपकरण दाेन दिवसांमध्ये 1 ग्रॅम विष जमा करते.