आय हेट यू टू : बऱ्याचदा मुले आई- वडिलांना रागाच्या भरात काही बाेलून जाता व आई-वडीलही रागाने त्यांना तेही त्यांच्यावर प्रेम करीत नाहीत असे बाेलून जातात. स्थिती सामान्य झाल्यानंतरही या बाेलण्याचा दंश नष्ट हाेणे श्नय नसते. ना मुलांसाठी ना आई-वडिलांसाठी.
तुला नाही रे जमणार : एखाद्याच्या स्वप्नांविषयी ‘तुझ्याकडून हे हाेऊ शकणार नाही वा तू वेडा झाला आहेस का? ’ असे बाेलणे काेणाच्याही मनावर खाेल आघात करू शकते. कदाचित तेव्हा ते गप्प राहतील पण नात्यात कायमची दरी निर्माण हाेईल.
वेगळं व्हायला पाहिजे : दांपत्यात छाेट्या छाेट्या तक्रारींमध्ये बऱ्याचदा वेगळे हाेण्याची गाेष्ट बाेलली जाते. ही गाेष्ट सलते कारण जाे असा विचार करताे ताेच हे बाेलू शकताे.
गप्प बसणे : एखाद्याबाबत एखादी वाईट घटना घडली असेल वा एखादा जीवघेण्या आजारातून बाहेर पडत असेल तर त्याच्यासमाेर गप्प राहणे नात्याला घातक ठरू शकते. काय बाेलणार, असा विचार करीत काहीच न बाेलणे आपल्याला समाेरच्याची पर्वा नाही हेच सिद्ध करीत असते.
कुटुंबीयांविषयी बाेलणे : चुकूनही काेणाही जवळच्या माणसाविषयी काेणतेही नकारात्मक मत व्यक्त करू नये. कारण हएखाद्याचे मन इतके दुखावते की, कदाचित ताे हे आयुष्यभर विसरू शकत नाही व माफ करू शकत नाही.
तुलना करणे : तुझा भाऊ तुझ्यापेक्षा चांगला आहे किंवा तुझ्यापेक्षा ताे चांगला आहे अशा प्रकारच्या तुलनात्मक गाेष्टी समाेरच्या व्यक्तीला आपला विराेधक बनवू शकतात. तुलना पाणउतारा करीत असते व ताे काेणालाच पसंत नसताे.