प्रतीतीची काही एक कमतरता नाहीये. संपूर्ण जीवनाचा हाच अनुभव आहे की जीवन दु:ख आहे. पण आपण कसले खरे निष्कर्ष यातून काढीत नाही. अन् निष्कर्ष न काढण्याची यु्नती माेठी गंमतीदार आहे. एक सुख जेव्हा दु:ख सिद्ध हाेते, तेव्हा तुम्ही असा विचार कधीच करीत नसता की दुसरं सुखही दु:खच सिद्ध हाेणार आहे. नाही, दुसऱ्याचा माेह कायमच असताे. ते सुखही दु:ख सिद्ध हाेते, पण मग तेवढ्यात मन तिसऱ्या सुखावर आरूढ झालेले असते. तिसऱ्याचा माेह कायमच राहताे.हज्जारवेळा अनुभव आला तरीसुद्धा जीवन दु:ख आहे. या निष्पत्तीला तुम्ही येत नाही. हा असे मात्र वाटत राहते की एक सुख दु:ख सिद्ध झाले, पण समस्त सुख हेच दु:ख सिद्ध झाले.
अशा निष्पत्तीला आपण काही अजूनपर्यंत आलेलाे नाहीत. या निष्पत्तीला केव्हा पाेचणार? प्रत्येक जन्मात ताेच अनुभव येताे पण...
प्रत्येक जन्मात ताेच अनुभव येताे. पूर्वजन्माचे एक लांब राहिले, तरी एका जन्मातच लाखाेवेळा हा अनुभव येत असताे. निष्कर्ष न काढणारा प्राणी अशी माणूस प्राण्याची व्याख्या करावी की काय असे वाटते.ताे निष्कर्ष काढायचे बराेबर टाळताे. काल केलेल्या चुकाच ताे आजही करताे. इतकेच काय चुका करायचा सराव झाल्याने आजच्या चुका करण्यात त्याचा हातखंडा असताे. चुकीने ताे काय शिकताे तर चुका करण्याचे काैश्यल्य! चुकांमधून ताे निष्कर्ष तर काहीच काढीत नाहीये.