आमेर किल्ल्याचा शीशमहाल का बांधला गेला? जयपूरचे राजा जयसिंह यांनी असा ‘शीशमहाल’ बांधला जेव्हा त्यांची राणी झाेपायची तेव्हा तिला हजाराे काचेच्या मेणबत्त्या किंवा दिव्यांच्या प्रकाशात आकाशातील तारे दिसू शकतील, कारण त्या काळात राण्यांना आकाशाखाली झाेपण्याची परवानगी नव्हती किंवा छप्पर नसलेल्या खाेल्यांमध्येही राहण्याचे परवानगी नव्हती. म्हणून, राजा जयसिंहने राणीसाठी हे शीशमहाल बांधले जेणेकरून राणी झाेपली की तिच्या खाेलीतील हजाराे काचेच्या मेणबत्त्या किंवा दिवे आकाशातील तारे प्रतिबिंबित करतील.शीशमहालासाठीच्या काचा खास बेल्जियममधून मागवण्यात आल्या हाेत्या. राजस्थान हे राजवाडे आणि किल्ल्यांचे राज्य मानले जाते.
त्यापैकी, जयपूर शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण म्हणजे आमेर किल्ला. ‘जाेधा अकबर’ चित्रपटातील काही दृश्ये याच किल्ल्यात चित्रित करण्यात आली हाेती. खरं तर, संपूर्ण किल्ला इतिहासाच्या संकेतांनी भरलेला आहे. 18व्या शतकाच्या सुरुवातीला राजा मानसिंह आणि राजा जयसिंह प्रथम यांनी किल्ल्याचा विस्तार केला. आमेर किल्ला हा राजपूत स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे आणि त्याच्या काही इमारतींमध्ये मुघल स्थापत्यकलेची झलक दिसून येते. म्हणूनच 18व्या शतकात या किल्ल्याला शीशमहालची भर घालण्यात आली. आमेर किल्ल्याला भेट देणाऱ्या लाेकांना शीशमहालाची भव्यता समजावी यासाठी प्रकाश आणि ध्वनी शाे देखील आयाेजित केला जाताे. रात्रीच्या प्रकाशातही, शीशमहालाची भव्यता लक्षवेधी ठरते.