जीवनात मनःशांती आणि आनंद कायम राहण्यासाठी...

    28-Jan-2025
Total Views |
 

Health 
 
 
स्वतःची मनःशांती आणि आनंद कायम राहावा यासाठी पुढील व्यक्तींपासून लांब राहावे.अगदी छाेटी-माेठी चिंधीगिरी करणाऱ्या पासून ते निराशावादी लाेकांपासून लांब राहणे हे आपल्या आनंदासाठी आणि समाधानासाठी महत्त्वाचे असते.मानसशास्त्रज्ञांच्या मते आपल्या मनाची शांती आणि आनंद कायम ठेवायचा असेल तर पुढील विखारी लाेकांपासून लांब राहावे.
 
भावनिक चलाखी करणारे - अनेक लाेकांना परिस्थिती साेयीप्रमाणे बदलण्याचे काैशल्य असते. ते त्यांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या अजेंड्यानुसार वागत असतात. अशा चलाख लाेकांना दुसऱ्यांच्या कमकुवत बाजू माहित असतात आणि मग ते त्यांचे भावनिक दृष्ट्या शाेषण करण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्तींपासून नेहमीच लांब राहावे.मीपणा करणारे - अनेकांना सतत स्वतःचा माेठेपणा मिरवण्याची आणि दाखवण्याची सवय असते. असे लाेक बाहेरून यशस्वी आणि आकर्षक वाटतात परंतु आतून ते अतिशय असुरक्षित असतात.त्यांना नेहमी इतरांबाबत असुरक्षित वाटत असते. त्यामुळे ते स्वतः चा मीपणा पुढे करत असतात.कायम हे लाेक अहंकारी असतात आणि दुसऱ्यांना नियंत्रणात ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असताे.अशा व्यक्तींपासून लांब राहावे.
 
स्वतःला बिचारा/बिचारी दाखवणारे - काही लाेकांना आपण किती बिचारे आहाेत आणि आपल्यावर सगळे अन्याय कसे करतात असे दाखवून इतरांचे लक्ष वेधण्याची, सहानुभूती मिळवण्याची सवय असते.इतरांनी सतत आपल्याकडे लक्ष द्यावे अशी त्यांची इच्छा असते.मात्र ते इतरांशी तसे कधीही वागत नाहीत. गॅस लाइटर वृत्तीचे काही लाेक असतात. ते नेहमी खाेटे बाेलतात किंवा वस्तुस्थिती दिशाभूल करून सांगतात आणि मग समाेरच्या व्यक्तीच्या मनात साशंकता आणि गाेंध