आराेग्यासाठीचे काही व्यायाम, प्रदूषणाची जाेखीमही कमी करतात

    27-Jan-2025
Total Views |
 
 

Health 
सुदृढ शरीरासाठी व्यायाम आणि शरीर सक्रिय राखणे आवश्यक आहे. नुकत्याच झालेल्या एका शाेधात दावा केला गेला आहे की, प्रदूषणाचे प्रभाव कमी करण्यातही नियमितपणे केलेला एक्सरसाइज खूप प्रभावशाली असताे.हाँगकाँगच्या चायनीज विद्यापीठाच्या पब्लिक हेल्थ अँड प्रायमरी केअरचे डाॅ. जियांग कियान लाओ म्हणतात, एक्सरसाइज करण्याची सवय असणाऱ्या लाेकांना याचा सर्वांत माेठा ायदा हा हाेताे की, यामुळे त्यांच्यामध्ये वायुप्रदूषणामुळे हाेणाऱ्या मृत्यूचा धाेका कमी असताे. या अध्ययनात हे जाणण्याचा प्रयत्न केला गेला की, नैसर्गिक कारणांमुळे जाेखमीवर नियमित व्यायाम आणि वातावरणात सूक्ष्म कणांच्या दीर्घ काळापर्यंत पडणारे प्रभाव काय हाेऊ शकतात.