चाैरस आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी-शांत झाेप यामुळे आराेग्य चांगले राहते. प्राैढ व्यक्तींना किमान सात तास झाेप आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पण, सध्याच्या काळातील स्पर्धा, तणाव, वाढता स्क्रीन टाइम आणि अन्य कारणांमुळे झाेपेचे तास कमी हाेत चालले असून, त्याचा परिणाम शारीरिक-मानसिक आराेग्य ढासळण्यात हाेत आहे. थकलेल्या शरीराला विश्रांती मिळावी म्हणून निसर्गाने झाेपेची याेजना केली असली, तरी आपण मात्र ती कमी करत चाललाे आहाेत. रात्री पुरेशी झाेप न झाल्याचे परिणाम दुसऱ्या दिवशी आळस, कंटाळा आणि थकव्याच्या रूपाने दिसायला लागतात. पॅरिस ऑलिम्पिकस्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट घेतली तेव्हा, ‘खेळ अथवा काेणत्याही क्षेत्रातील चांगल्या कामगिरीसाठी पुरेशी झाेप आवश्यक असल्यामुळे झाेपेबराेबर तडजाेड करू नका,’ असा सल्ला या खेळाडूंना देत पंतप्रधानांनी झाेपेचे महत्त्व अधाेरेखित केले.
झाेप एवढी महत्त्वाची असूनही अनेकांना ती लवकर येत नाही अथवा पुरेशी मिळत नसल्यामुळे बाजारपेठेत अनेक साधने दाखल झाली आहेत. ‘स्लीप डाॅ्नटर्स’पासून झाेप येण्यासाठी तयार करण्यात आलेल्या उशा (पिलाेज) आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानावर आधारित गॅजेट्स असा त्यांचा पल्ला आहे. या सगळ्यांतून झाेपेच्या बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढत चालली आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या खेळाडूंना पुरेशी झाेप मिळावी याची काळजी घेतली जाणार असून, त्यासाठी विशेष डाॅ्नटर नियुक्त केले जातील, असे नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ दिनशाॅ पारडीवाला यांनी सांगितले.खेळाडूंच्या झाेपेच्या पॅटर्नची माहिती घेण्यासाठी डाॅ. माेनिका शर्मा यांनी गेला महिना देशभर प्रवास करून सर्व डेटा मिळविला. स्पर्धेपूर्वी खेळाडूंना पुरेशी झाेप मिळण्याची दक्षता त्या घेणार आहेत.
पॅरिसमध्येही खेळाडूंना पुरेशी झाेप मिळावी म्हणू गेम्स व्हिलेज आणि शूटिंग रेंजच्या परिसरात स्लीप पाॅड्स बसविण्यात आले आहेत. त्यात तापमानआणि प्रकाशाच्या तीव्रतेचे नियंत्रण करता येते आणि ते साउण्ड प्रूफ असल्याने खेळाडूंना शांत झाेप मिळते.
‘झाेप’ हा वाढत चाललेला व्यवसाय असल्याचे या संदर्भात संशाेधन करणाऱ्या ‘इमजेन रिसर्च’ या संस्थेने नमूद केले आहे.झाेपेच्या क्षेत्रातील जागतिक उलाढाल 2022मध्ये 512.80 अब्ज डाॅलरची हाेती आणि 2032पर्यंत ती 950.22 अब्ज डाॅलरपर्यंत जाण्याचा या संस्थेचा अंदाज आहे.झाेपेसाठी गॅजेट्स पुरेशा झाेपेसाठी बंगळुरूमधील ‘वेकफिट.काे’ ही कंपनी बाजारपेठेत उतरली आहे. ‘वेकफिटझेन्स’ या नावाने कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानावरील स्लीप साेल्यूशन्सची मालिका बाजारात आणली असून, त्यात ‘रेग्यू18’ ही तापमान नियंत्रित ठेवणारी गादी (मॅट्रेस) आणि ‘ट्रॅक8’ या काॅन्टॅ्नटलेस स्लीप ट्रॅकरचा समावेश आहे
.
‘रेग्यू18’ या मॅट्रेसचे तापमान 15 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान सेट करता येते. आपल्या झाेपेच्या वेळेनुसार ते निश्चित करता येते. ‘ट्रॅक8’ हा नाॅन-वेअरेबल स्लीप ट्रॅकर असून, मॅट्रेसखाली असलेल्या सेन्सर शिटचे विश्लेषण करून ताे झाेपेचा डेटा देताे, त्यात सुधारणाही सुचविताे. देशातील निम्मे लाेक झाेपेपासून वंचित असल्याचे ‘वेकफिट’चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी यश दयाळ यांनी सांगितले. इन्व्हेस्टकाॅर्प, व्हेर्लिनव्हेस्ट आणि पीक ए्नसव्हीसारख्या गुंतवणूकदारांकडून या कंपनीने 145 दशलक्ष डाॅलरचा निधी मिळविला असून, आर्थिक वर्ष 2023मध्ये या कंपनीचा महसूल 825 काेटी रुपये हाेता. ‘द स्लीप कंपनी’ने (टीएससी) स्मार्ट ग्रीड तंत्रज्ञान आणले आहे. हायपर-इलॅस्टिकपाॅलिमरचा वापर या ग्रीडमध्ये करण्यात आलेला असल्याने शांत झाेपेसाठी त्याचा फायदा हाेताे. गेल्या डिसेंबरमध्ये या कंपनीला विद्यमान गुंतवणूकदारांकडून 184 काेटी रुपयांचे सी फंडिंग मिळाले आहे.