आता ट्रेनला रुळांमधूनच वीजपुरवठा, लटकणाऱ्या तारा काढून टाकणार

    16-Jan-2025
Total Views |
 

train 
 
इंजिनने ओढली जाणारी राजधानी, शताब्दी किंवा इतर ट्रेनच्या जागी नवीन सीरिजच्या ट्रेन येतील; त्यांच्यात इन-ट्रेन इंजिन असेल.
राजधानी, शताब्दी आणि इतर प्रवासी ट्रेनना नवीन काळातील ट्रेनमध्ये बदलण्याच्या प्रक्रियेतून जाणारी भारतीय रेल्वे लाेकाेमाेटिव्ह, विजेचे खांब आणि मॅन्युअल सिग्नलिंग तसेच ट्रॅक सिस्टीमलासुद्धा सिस्टीममधून बाहेर काढणार आहे. केवळ ट्रेनच नाही तर संपूर्ण रेल्वे चालण्याची व्यवस्था नवीन काळाप्रमाणे तयार हाेईल. इतकेच नाही तर जास्त सुरक्षित आणि वेगाने जाणारीही असेल.रेल्वे बाेर्डाच्या सूत्रांनुसार वंदे भारत, अमृत भारत, नमाे भारत मेट्राे अशा नवीन सीरिजच्या ट्रेन आल्यानंतर ट्रॅ्नशन सिस्टीम (वीज पुरवठा)मध्ये बदलासाठी प्राेटाेटाइप ट्रायल सुरू झाली आहे. आता ट्रेनला वीजपुरवठा रेल्वे रुळांच्या बाजूला असलेल्या खांबांवर तार लटकवून केला जाताे. पण आता वीजपुरवठा लाइव्ह रेल किंवा थर्ड रेल म्हणजे कंड्नटर रेलच्या माध्यमातून करण्याचा विचार आहे.
यामध्ये रुळांच्या बाजूला वेगळी लाइन टाकली जाते, त्यामुळे वीजपुरवठा हाेताे.
 
ही व्यवस्था बंगळुरू मेट्राेमध्ये काम करत आहे.मेटल फेन्सिंग ट्रॅक, ट्रेन स्पीड 160 किमी असेल देशात संपूर्ण ट्रॅक नेटवर्कवर मेटल फेन्सिंग हाेईल. त्यानंतर सहा ट्रंक रूट्स (व्यस्त मार्ग) वर 160 किमी दर ताशी या वेगाने ट्रेन धावू शकतील. तीन टप्प्यांमध्ये हाेणाऱ्या फेन्सिंगचा पहिला टप्पा दाेन वर्षांत पूर्ण हाेईल.दल्ली-मुंबई रूटवर 600 किमी (35%) मध्ये फेन्सिंग लावले गेले आहे. डब्ल्यू आकाराच्या मेटल फेन्सिंगमुळे ट्रॅकवर प्राण्यांचे येणेजाणे थांबू शकेल.यात किती कालावधी लागू शकेल? संपूर्ण रेल नेटवर्कमध्ये याला एकाच वेळी लागू करणे श्नय नाही, जाेपर्यंत इन-ट्रेन इंजिन (वंदे भारत सारखे) नसेल. अर्थात त्यामुळे इंजिन वेगळे लावावे लागणार नाही. इंजिनने ओढली जाणारी राजधानी, शताब्दी किंवा इतर ट्रेनच्या जागी नवीन सीरिजच्या ट्रेन येतील; त्यांच्यात इन-ट्रेन इंजिन असेल. मालगाड्यांचे काय हाेईल? रेल्वे बाेर्डाच्या सूत्रांच्या नुसार मालगाड्यांचे स्वरूपही बदलेल. काही अशी प्राेजे्नट्स सुरू हाेतील, ज्यांच्यात मालगाड्या सुद्धा इन-ट्रेन इंजिनद्वारे चालतील.