कॅम्परव्हॅनमधून प्रवास आणि मु्नकामाचा ट्रेन्ड

    12-Jan-2025
Total Views |
 
 

Van 
ध्रुव नाॅर्थ हा एका बहुराष्ट्रीय कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट पदावर काम करत हाेता आणि यशस्वी म्हणता येईल अशी त्याची करिअरमधील वाटचाल हाेती. पारंपरिकदृष्ट्या जी एखाद्याची स्वप्ने असतात ती सगळी त्याची पूर्ण झालेली हाेती. आता आलिशान ठिकाणी सुट्टी घालवणे किंवा आयात केलेल्या महागड्या कार्स त्याला आनंद देत नव्हत्या. ही गाेष्ट 2015 मधील.त्यानंतर सात वर्षांनंतर 2022 मध्ये तेथून 900 किलाेमीटर अंतरावर अहमदाबादमध्ये 2022 ला आदित्य बँकरदेखील अशाच परिस्थितीत अडकलेला हाेता. त्याच्या मालकीची दाेन मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल उभी हाेती आणि आता त्याला वाटत हाेते की, आपण यातून बाहेर पडण्याची गरज आहे. त्यामुळे वयाच्या 43 व्या वर्षी त्याने नव्या क्षेत्रात पदार्पण केले. नाॅर्थ आणि बँकर आता दाेघेही देशभर कॅम्परव्हॅनमधून दाैरे आणि प्रवासात असतात आणि त्यांच्या जगण्यामध्ये 180 अंशांचा फरक झालेला आहे.
 
पाश्चिमात्य देशांमध्ये कॅम्परव्हॅन संस्कृती ही रुजलेली आहे. भारतात मात्र या प्रकारच्या प्रवासाला दीर्घकाळ प्रतिसाद मिळत नव्हता.साधारणपणे अशा पद्धतीने भटकणे म्हणजे हिप्पी संस्कृती असल्याचे मानले जात हाेते. मात्र, आता त्यामध्ये बदल झालेला आहे. विशेषतः काेव्हिडच्या साथीनंतर भारतात लाेक वेगवेगळ्या पद्धतीने फिरायला आणि सहलीला जाऊ लागले आहेत. जिथे पाहिजे तिथे आणि ज्या पद्धतीने जाता येईल तशा पद्धतीने लाेक पर्यटनाला जाऊ लागलेले आहेत.ध्रुव नाॅर्थला बाहेर फिरण्याची जीवनशैली आवडते आणि दहा वर्षांपूर्वी त्याने कॅम्पिंग पद्धतीने प्रवासाला सुरुवात केली. त्याच्या दृष्टीने स्वातंत्र्य आणि आनंद याचा अर्थ एकच आणि ताे म्हणजे प्रवास करत राहणे. त्यासाठी त्याने त्याच्या सात आसनी कारचे रूपांतर कॅम्पिंग कॅम्परव्हॅनमध्ये केले आहे. त्यानंतर त्यात आणखी बदल करून सर्व कुटुंबीय कॅम्परव्हॅनमध्ये पार्टटाइम राहतील व कामासाठी पार्टटाइम शहरात राहतील, अशा सुविधा निर्माण केलेल्या आहेत.
 
बँकरचीदेखील अशीच गाेष्ट आहे. त्याने देखील त्याच्या फाेर्ड एन्डेव्हर कारमध्ये छाेटे किचन तयार केले आहे. ताे आणि त्याच्या पत्नीने या कारमधून भारतभर प्रवास केलेला आहे. दाेन वर्षांपूर्वी त्याने कॅम्पर व्हॅन घेतली आणि आता ताे निम्मा वेळ प्रवासात असताे आणि निम्मा वेळ त्याच्या गावात असताे.काही महिन्यांपूर्वीच ताे या कॅम्परव्हॅनमधून ईशान्यकडील राज्यांचा 40 दिवसांचा प्रवास करून आला आहे. या प्रवासात मला एकही वाईट किंवा चुकीचा अनुभव आला नाही, असे ताे आवर्जून सांगताे.जेव्हा तुम्ही राेजचे सकाळी दहा ते सहा असे कामाचे वेळापत्रक साेडून निसर्गाच्या सहवासात राहता तेव्हा तुमच्या मनाला आणि शरीराला निवांतपणाचा अनुभव येताे. असे असले तरी प्रत्येक वेळेला असेच घडतेच असे नाही. त्यामुळे माेटर हाेममध्ये राहणे हा एक शिकत राहण्याचा अनुभव असताे.
 
विवेक शर्मा हा राजस्थानातील अजमेरला राहताे आणि डाॅ्नयुमेंटरी फिल्म मेकर आहे.ताे स्वतःचे कॅम्परव्हॅन भारत हे चॅनेल यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर चालवताे. ताे म्हणताे, की काेव्हिडच्या काळातील बद्रीनाथची दहा दिवसांची ट्रिप मला भरपूर अनुभव देणारी हाेती.या प्रवासाने मला प्रेरणा दिलीच, परंतु एकंदरीत जीवनशैली विषयीचा नवा दृष्टिकाेन दिला. आता ताे त्याच्या कॅम्परव्हॅनमधून कुटुंबासह पार्टटाइम फिरत असताे. अगदी वर्षापूर्वीपर्यंत त्याची आई देखील कॅम्परव्हॅनमधून प्रवास करत असे.
त्यासाठी त्याने कॅम्परव्हॅनमध्ये किचन, वाॅशरूम, वाॅशिंग मशीन, वाॅटर स्टाेरेज, झाेपण्याची जागा, अशा सर्व सुविधा तयार करून घेतलेल्या आहेत.जेव्हा शर्मा कुटुंबीय कॅम्परव्हॅनमधून दीर्घकाळ प्रवास करत फिरत असतात, तेव्हा त्यांची पत्नी आणि ते स्वतः अकरा वर्षांची मुलगी आणि नऊ वर्षांचा मुलगा यांना हाेमस्कूल पद्धतीने शिक्षण देत असतात.
 
त्यांच्या मते खरे शिक्षण हे व्यक्तीला प्रवासातूनच मिळत असते. जेव्हा फिरत असताना आम्ही एखाद्या खेड्यामध्ये मुक्काम करताे, तेव्हा मुलांना तेथील स्थानिक संस्कृती प्रथा परंपरा माहीत हाेण्याची संधी उपलब्ध हाेते.माझ्या मुलांसाठी म्हणाल, तर रस्त्यांनी माझ्या मुलांचा दृष्टिकाेन व्यापक बनवलेला आहे आणि त्यांना जीवनविषयक काैशल्यदेखील शिकवलेली आहेत, जी घरातील आरामदायी परिस्थितीत शिकू शकली नसती. उलट आता मुले ही कुठलाही तणाव आणि भीतीच्या, स्पर्धेच्या दबावाखाली नसल्याने प्रवासात अनेक सहजपणे गाेष्टी शिकत राहतात.
 
कार व्हॅनचा बिझनेस: ध्रुव नाॅर्थ यांनी 2015 मध्ये त्यांच्याकडे असलेल्या बजाज टेम्पाे मॅटेडाेर मध्ये सुधारणा केल्या मात्र त्यासाठी त्यांना खूप वेळ आणि शक्ती खर्च करावी लागली. ते म्हणतात, माझी व्हॅन ही काहीशी जुनी हाेती आणि त्यात बदल करणे हे अतिशय आव्हानात्मक काम हाेते. भारतात कुठेही फक्त कारव्हॅनचे काम करतील असे फॅब्रिकेटर कुठेही नाहीत.बहुतेक जण व्हॅनिटी व्हॅनसाठी काम करतात आणि कार व्हॅन हा त्यांच्या कामाचा एक छाेटासा भाग असताे. त्यामुळे नाॅर्थ यांनी प्राे कॅम्पर इंडिया नावाने व्यवसाय सुरू केला आणि अहमदाबाद व नाेएडा मध्ये कारव्हॅन्स माॅडीफाय करण्याच्या दाेन ॅ्नटरीज उभारल्या. ते म्हणतात कारखान्यात कारव्हॅन्सचा वापर करणारा ग्राहक म्हणून माझा स्वतःचा अनुभव लक्षात घेऊन आणि येणाऱ्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन मी याेग्य पद्धतीने अपग्रेड करताे.
 
एक काेटीपर्यंत खर्च: मात्र कार व्हॅन तयार करणे ही काही साेपी गाेष्ट नव्हे.व्हॅल्युएबल व्हील्स इंडिया कंपनीचे सीईओ सचिन सिंग भदाेरिया म्हणतात, की व्हॅन माॅडीफाय करण्यासाठी अगदी एक काेटी पर्यंत रक्कम आकारली जाते आणि लाेकही ते द्यायला तयार असतात. त्या उलट तुम्ही जर का मारुती इकाे माॅडीफाय करायचे ठरवले, म्हणजे त्यामध्ये एक छाेटेसे किचन बेड आणि एक विजेचे कने्नशन तर त्यासाठी तुम्हाला सात ते नऊ लाख रुपये खर्च येताे.