आणि जावेद साहेबांचा पत्ता कट झाला

    09-Sep-2024
Total Views |
 
 

prem 
 
सलमान खान फाॅर्मात हाेता तेव्हा नवा सुपरस्टार अशी त्याची ख्याती झाली हाेती. त्या काळात धडाधड प्राेड्यूसर लाेकप्रिय नटांना साइन करायचे. मग नटाच्या इच्छेनुसार दिग्दर्शक, लेखक, नायिका, गीतकार, संगीतकार यांची निवड केली जायची.तुला हव्या त्या माणसाला निवड, पण माझा सिनेमा कर असं निर्माता हात जाेडून सांगत असे. राजेश खन्ना, अमिताभ असे सगळे सुपरस्टार आपल्या सिनेमाच्या गीतसंगीतातही लक्ष घालत. अनेकदा रेकाॅर्डिंगलाही हजर असत. अशा काळात साजन या सिनेमाचा प्रस्ताव घेऊन निर्माते सलमानकडे गेले.
 
सलमानने कथा ऐकली. ती त्याला आवडली. साेबत संजय दत्त हाेता, ताे मित्रच हाेता, भावासारखा. तिथे काही प्राॅब्लेम नव्हता. नायिका माधुरी, ती टाॅपची हिराेइन. संगीतकार नदीम श्रवण.तेही टाॅपचे. मग सलमानने विचारलं, गाणी काेण लिहिणार आहे? निर्माते म्हणाले, जावेद अख्तर साहेब. तेही टाॅपचे गीतकार हाेते तेव्हाचे.सलमान शांतपणे म्हणाला, मग मी तुमच्या बॅनरचा पुढचा सिनेमा करेन. या सिनेमासाठी दुसरा नायक घ्या. सलीम-जावेद जाेडी फुटली त्यानंतरचा हा काळ हाेता. सलीम यांना बऱ्यापैकी अंधारात ठेवून जावेद यांनी आकस्मिक हा निर्णय घेतला हाेता. सलमानने म्हणूनच त्यांच्याबराेबर काम करणं नाकारलं.अर्थात, जावेद साहेबांच्या जागी समीर आला. सलमानला काेण काढणार?