कुत्रा चावला, तर तुम्ही काय कराल?

    09-Sep-2024
Total Views |
 
 
dog
 
कुत्रा चावल्यानंतर हाेणारे सेल्यूलायटिस संक्रमण त्वचेच्या सर्वांत खालच्या स्तरावर परिणाम करते.सामान्यत: हे दंड, हात, पाय, पंजा, छाती व पाेटावर हाेत असते. काहींच्या लिम्फ नलिकांना सूज येते. तेच रॅबीज नर्व्हस सिस्टीमशी संबंधित एक प्राणघातक संक्रमण आहे.अत्यंत गंभीर केसेसमध्ये सुरुवातीला जखमेच्या जागी वेदना हाेतात. त्यानंतर अस्वस्थता, गुंता, भ्रम, आवाजात बदलाची लक्षणे दिसू लागतात. काहीजण हिंसकही हाेतात. काहीत बेशुद्धी व पाण्याला घाबरण्याची लक्षणे दिसतात. ही स्थिती प्राणघातक असते.
 
काही गाेष्टी लक्षात ठेवा = जर कुत्रा पाळीव असेल तर त्याच्या मालकाकडून व्हॅ्नसीनेशनची माहिती घ्या. थाेडासाही संशय आला तर इंजे्नशन टाेचून घ्या. भटका कुत्रा चावल्यास पहिले इंजे्नशन चाेवीस तासांच्या आत घेण्याचा सल्ला दिला जाताे. कमीत कमी 72 तासांच्या आत डाॅ्नटरांकडून इंजे्नशन अवश्य घ्यायला हवे. खाेल जखम असल्यास इम्युनाेग्लाेबिनचाा उपचार दिला जाताे. हे एकप्रकारचे रेडीमेड अँटीबाॅडीज असते.
 
=चावल्यानंतर जखमेची जागा नळाखाली ठेवून साबणाने सतत 15 मिनिटांपर्यंत धुवावी.
 
=जखमेवर कधीही मिरची वा इतर काेणताही पदार्थ लावू नये. यामुळे संक्रमण वाढू शकते. वारंवार जखमेला स्पर्श करू नये. एखादे अँटीबायाेटिक क्रीम, स्पिरिट जखमेवर लावू शकता.
 
= जर पाळीव कुत्रा चावला असेल तर तेव्हाही काही अँटीबायाेट्निसची गरज पडू शकते. डाॅ्नटरांना अवश्य भेटावे.
 
=अँटी रॅबीज इंजे्नशनचा काेर्स अवश्य पूर्ण करावा अन्यथा हे प्राणघातक ठरू शकते. एकूण सहा इंजे्नशन लागतात. पहिले इंजे्नशन चावल्यानंतर त्वरित देतात. त्यानंतर 3, 7, 14, 28 दिवसांनंतर इंजे्नशन देतात. सहावे इंजे्नशन तीन महिन्यांनंतर देतात. हे पर्यायी असते. सहाव्या इंजे्नशननंतर व्यक्ती पूर्ण एक वर्षासाठी रॅबीजपासून मुक्त हाेते. अशात जर आणखी एखादा रॅबीज पसरवणारा प्राणी चावला तर इंजे्नशन घेण्याची गरज नसत