व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायाेजन हाेत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारिरीक, मानसिक यंत्रणेची संघटना हाेय.व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गाेळा बेरीज हाेय.व्यक्तिमत्व विकासात अंतस्त्राव ग्रंथीचा महत्वाचा वाटा आहे.कंठपिंडातून जास्त स्त्राव हाेऊन रक्तात मिसळला तर वर्तनात अस्थिरता व चांचल्य येते. हा स्त्राव कमी झाला तर व्यक्ती सुस्त बनते. वृकस्थ पिंडातील स्त्रावामुळे भावनिक उद्रेकांच्या समयी शरीरव्यापारावर ताबा राहताे. बाैद्धिक क्षमतेचा व्यक्तिविकासावर फार परिणाम हाेताे.
ज्या गाेष्टी तैलबुद्धीच्या व्यक्ती सहज करू शकतात त्या गाेष्टी मंद बुद्धीच्या व्यक्तींना जमत नाही. एखाद्या व्यक्तीच्या बुद्धीची चमक दिसताच अन्य व्यक्ती प्रभावित हाेतात. बुद्धिसामर्थ्याने काेणतीही व्यक्ती इतरांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकते.अभिक्षमतेमुळे व्यक्तिमत्व परिपुष्ट हाेण्यास मदत मिळते. घर हाच मुलांचा पहिला सामाजिक परिसर हाेय. आई वडील व कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या वर्तनाचा तसेच घरातील एकूण वातावरणाचा मुलांच्या वर्तनावर परिणाम हाेताे.मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्याची मातृप्रेमाची गरज याेग्य त्या प्रमाणात लहानपणी भागविली जाणे अत्यावश्यक असते. ज्या मुलाला प्रेमळ, वत्सल, सद्वर्तनी, फाजील लाड न करणारे व अपत्याच्या याेग्य विकासाची काळजी घेणारे आई वडील लाभतात त्यांचे व्यक्तिमत्व याेग्य रीतीने उमलते.
घरात वडिलांचा आवश्यकतेपेक्षा जास्त दरारा असेल व मुलाला काेठलेही स्वातंत्र्य लाभत नसेल तर अशी मुले भित्री कातर स्वभावाची हाेतात. मातापित्यांचा लहानपणीच वियाेग झालेली मुले धास्तावलेली व चिंताग्रस्त हाेतात. ज्या मुलांचे फाजील लाड हाेतात, ती मुले लहरी, स्वार्थी व हेकट स्वभावाची हाेतात.ज्येष्ठ मुले दादा बनण्याची, शेंडेफळ जास्त हेकट हाेण्याची तर मधली मुले आक्रमक हाेण्याची शक्यता असते.एकुलत्या एका मुलाला आपल्या बराेबरीच्या मुलांचा सहवास न लाभल्यामुळे अकाली प्राैढत्व येते. मुलांकडून पालकांनी लहानपणीच ग्रामगीता, ज्ञानेश्वरी, विविध आरती संग्रह, हरिपाठ पाठ करून घेतले तर माेठेपणी आपाेआप मुलांवर चांगले संस्कार हाेतात.