आपले दाेष ऐकण्याचीही तयारी ठेवा

    07-Sep-2024
Total Views |
 
 

thoughts 
 
टीकाकारांचे ताेंड बंद करण्यासाठी तसेच अनुकरण करू लागतात. आपले हे वर्तन याेग्य आहे का? मात्र, आजच्या घडीला प्रत्येक व्य्नतीला वाटते की, त्याची प्रशंसा व्हावी; पण काही लाेक बढाया मारून प्रशंसा करण्यात तरबेज असतात किंवा टीका करतच किंवा दाेष सांगतच असतात. काैतुक व टीका प्रत्येक क्षेत्रात मग ती एखादा संस्था, कुटुंब व समाजात ऐकायला मिळतेच. असे प्रसंग बहुतेकदा एकत्र कुटुंबात घडतात. सासू-सुनेंचे भांडण व एकमेकीवर टीका हे तर जगजाहीर आहे. दुसरीकडे इतके काैतुक केले जाते, की ते ऐकून वाटते की हे आवश्यकतेपेक्षा अधिकच सांगितले जात आहे. मर्यादेपेक्षा अधिक काैतुक व टीका दाेन्हीही वाईटच आहे. तुम्ही केलेल्या थाेड्याशा प्रशंसेमुळे नैराश्य आलेल्या व्य्नतीला आशेचा किरण दिसू शकताे.
 
तुम्ही उठसूट टीकाच करीत असाल, तर तुम्हाला लाेक टीकाकाराच म्हणून ओळखतील.तुम्ही टीका अवश्य करा. मात्र ती याेग्य असावी. त्यात पूर्वग्रह नसावा.टीकाकार बनणे खूप साेपे आहे. मात्र दुसऱ्यांकडून आपल्यावरील टीका ऐकताना किती कठीण असते? टीका/दाेष ऐकायला काेणालाही आवडत नाही; पण तुम्ही कधी विचार केला, की आपला स्वभाव सुधारण्यात टीकाकारांची मदतच हाेते.लाेकांची आपल्यावरील टीका न्नकी ऐका. त्यामुळे आपल्यातील कमतरता व उणिवा दूर करणे साेपे जाईल.टीकेला घाबरू नका. उलट टीका ऐकण्याची हिंमत ठेवा. त्याने तुमचा जीवन मार्ग प्रशस्त हाेईल. आपल्या वाईटातील वाईट टीका पण कधीकधी आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नेते.
 
आपण गुणदाेष सांगणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्य्नत करायला हवी. ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केले.काैतुक आणि टीका या एकाच नाण्याच्या दाेन बाजू आहेत. त्यामुळे प्रशंसा जितकी चांगली वाटते, तेवढी टीकाही आनंदाने स्वीकारा.टीका आणि काैतुक अशी करा की समाेरच्याला त्याची जाणीवही हाेऊ नये. प्रशंसा आणि टीकेने आपण आपल्या क्षमता ओळखू शकताे.आपण त्यापासून पळ काढू नये. असे हाेऊ नये की आपण व्यवहारच बंद करावे. संतुलित प्रशंसा व याेग्य टीका केल्यास आपसात जवळीकता व स्नेह टिकून राहताे. लक्षात ठेवा की टीकाकाराला शत्रू समजू नये; तसेच नेहमी काैतुक करणाऱ्यांना आपला हितचिंतक समजू नये.