घशात सतत खवखवत असल्यास दुर्लक्ष करू नका

    07-Sep-2024
Total Views |
 
 

health 
 
 खवखव अ‍ॅलर्जी, अ‍ॅसिडिटी व सायनस यामुळेही हाेऊ शकते.
 
 याशिवाय घरातील पाळीव प्राण्यांचे केस डॅन्ड्रफ, माती वा धूळ इ.ही या त्रासाचे कारण असू शकते.
 
 सामान्यत: नाक जाम झाल्यास जेव्हा ताेंडाने श्वास घेतला जाताे. तेव्हा घशात खवखव उत्पन्न हाेते. बाहेरच्या वायुप्रदूषणामुळे घशात जळजळ हाेऊ शकते. घरात प्रदूषण, तंबाखूचा धूर वा केमिकल घशातील खवखवीचे कारण असू शकते.
 
घरगुती उपाय आजमावा
 
 ज्येष्ठमधाची छाेटीशी काडीथाेडा वेळ ताेंडात धरून चावा. खवखव व वेदनांपासून आराम मिळेल.
 
 लवंग ताेंडात धरून चाेखा.तसेच एक कप पाण्यात आले उकळून काेमट करून त्यात मध मिसळून दिवसातून दाेनदा प्या.
 
 2 ग्लास पाण्यात 5-7 तुळशीची पाने व 4-5 काळी मिरी उकळून काढा बनवून दिवसांतून दाेनवेळा प्या.
 
 संक्रमण टाळण्यासाठी जेवण्यापूर्वी व खाेकल्याशिंकल्यानंतर हात स्वच्छ धुवा. दीर्घकाळ घसा खवखवत असल्यास डाॅक्टरांना अवश्य दाखवा.