अमेरिकन यूट्यूबर IShowSpeed आपल्या अतिशयाे्नती स्वभाव आणि स्टंटमुळे नेहमी चर्चेत असताे. ताे नेहमीच जगावेगळं काही करण्याचा प्रयत्न करताे. अनेकदा त्याची फजितीही हाेते.हे सर्व व्हिडिओ ताे साेशल मीडियावर शेअर करत असताे, जे व्हायरल हाेत असतात. नुकतंच त्याने चीनमधून विकत घेतलेल्या राेबाेट कुत्र्याचा रिव्ह्यू केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. तब्बल 84 लाखांत त्याने हा राेबाेट कुत्रा खरेदी केला आहे. पण, जेव्हा IShowSpeed ने भुंकण्यास सांगितलं, तेव्हा त्याने आग ओकण्यास सुरुवात केली. यामुळे IShowSpeed लाही आश्चर्याचा धक्का बसला.या व्हिडिओला चार काेटींपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत.
व्हिडिओत IShowSpeed राेबाेट कुत्र्याचं टेस्टिंग करताना दिसत आहे. यामध्ये कुत्राही कमांड फाॅलाे करताे. बसण्यास सांगितल्यावर बसत असून, हस्तांदाेलन करताना दिसत आहे.यूट्यूबरने या वेळी ब्लॅकफ्लिप करत कुत्र्यालाही तसंच करायला सांगताे. कुत्रा काॅपी करताना उडी मारताना दिसत आहे. पण जेव्हा IShowSpeed त्याला भुंकण्यास सांगताे, तेव्हा अनपेक्षित प्रकार घडताे.कुत्रा भुंकण्याऐवजी आग ओकण्यास सुरुवात करताे. यामुळे आश्चर्यचकित झालेला यूट्यूबर शेजारी असणाऱ्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारताे.