मुलांना खाेटे बाेलण्याची सवय लागली असेल, तर...

    06-Sep-2024
Total Views |
 

Child 
वाढत्या वयात मुले अनेकदा खाेटे बाेलायला शिकतात. अशा स्थितीत पालकांनी मुलांची ही सवय माेडली नाही आणि त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणली नाही, तर मग त्यांची ही सवय नंतरच्या काळात त्यांना अडचणीत आणते. अनेकदा आपल्या मुलांना काही विचारल्यावर ते खाेटे बाेलतात.तुम्ही छाेट्या छाेट्या गाेष्टींकडे दुर्लक्ष करू शकता, पण जर खाेटे बाेलण्याची सवय झाली तर भविष्यात ती माेठी समस्या बनू शकते. अशा परिस्थितीत सुरुवातीला खाेटे बाेलणे थांबवले तर याेग्य ठरते.मानसाेपचार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हाही एखादी व्यक्ती खाेटे बाेलते तेव्हा ताे डाेळे चाेरू लागताे. हे मुलांना देखील लागू हाेते.
उत्तर देताना जर ताे डाेळे चाेरू लागला आणि तुमच्या डाेळ्यात डाेळे घालून बाेलत नसेल तर हे त्याच्या खाेटे बाेलण्याचे लक्षण आहे. तुम्ही त्याला तुमच्याकड बघून बाेलायला सांगा.यानंतर, जर त्याने जबरदस्तीने डाेळ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तर याचा अर्थ ताे न्नकीच खाेटे बाेलत आहे.जेव्हा मूल तुमच्या प्रश्नाचे उत्तर नेहमीपेक्षा माेठ्या आवाजात देईल, तेव्हा समजून जा की, ताे खाेटे बाेलत आहे. किंबहुना माेठ्या आवाजातून ताे जे काही बाेलताेय ते खरे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करताे. तर खरे बाेलणारे मूल नेहमी सामान्य आवाजात बाेलत असते. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देताना जर मूल अडखळत असेल तर हे देखील त्याच्या खाेटे बाेलण्याचे लक्षण असू शकते.
मुले खाेटं बाेलत असतील तर त्यांची ही सवय दूर करण्यासाठी काही टिप्स...
सगळ्यात पहिली गाेष्ट म्हणजे मुले खाेटं बाेलण्यामागील कारण शाेधून काढण्याचा प्रयत्न करावा. कारण एक तर भीतीने किंवा कुठलीतरी गाेष्ट लपवण्यासाठी मुले खाेटं बाेलत असतात. त्यामुळे मुलांच्या खाेटे बाेलण्यामागील कारण समजून घेतले तर त्यांची ही सवय दूर करणे साेपे जाते.दुसरी गाेष्ट म्हणजे मुले आपल्या पालकांच्या वागण्या बाेलण्यातील सगळ्या गाेष्टी टिपत असतात आणि त्याची ते हुबेहूब काॅपी करत असतात.त्यामुळे पालकांनी कधीही खाेटे बाेलू नये आणि मुलांच्या समाेर तर खाेटे बाेलूच नये. त्यातून मग मुलांवर खरे बाेलण्याचे संस्कार हाेतात आणि तशी सवय लागते. तिसरी गाेष्ट म्हणजे मुलांना खरे आणि खाेटे यामधील फरक समजावून सांगा.त्यासाठी काही गाेष्टींची उदाहरणे देऊन खाेटे बाेलण्यामुळे नुकसान काय हाेते हे मुलांना सांगा.त्यामुळे मुले खाेटे बाेलण्यापासून दूर जातात.जर का तुमचे मूल त्याची चूक मान्य करत असेल तर अशावेळी मुलाला रागावू नका उलट त्याचे काैतुक करा आणि खरे बाेलण्यासाठी त्याला प्राेत्साहन द्या.