कशा लाेकांबराेबर राहता? आपण ज्या लाेकांबराेबर राहताे, ज्या वस्तूंना पाहण्यात ऐकण्यात वेळ घालविताे, त्याचा परिणाम आपल्या मूडवरसुद्धा हाेताे. जर आपण सातत्याने अशा लाेकांबराेबर राहात आहात, जे नेहमी आपल्या कामात चुका काढत राहतात, रागात असतात, तक्रार करत असतात, किंवा नेहमी वाईटच विचार करतात, तेव्हा तुमच्या मूडवर परिणाम हाेणे निश्चित आहे. विशेषत: जर आधीपासूनच त्रासलेले असाल किंवा मूड बिघडला असेल तर अशा लाेकांपासून अंतर कायम ठेवा.
काय करावे?: आपला वेळ नेहमी याेग्य विचार करणाऱ्या लाेकांबराेबर व्यतीत करा. टीव्ही किंवा साेशल मीडिया, ज्या बाबींना जास्त पाहात-वाचत आहात त्यावर लक्ष द्या.खरी समस्या काय आहे? अनेक वेळा आपली चिडचिड बाहेरची नसते तर आपल्या आतमधील असते. अशा वेळी आतमध्ये ठीक केल्याशिवाय आपल्या रागावर काबू मिळविणे अवघड हाेते. काही बाबी किंवा लाेकांचे वागणे असे असू शकते की, जे तुम्हाला चिडण्यास किंवा ओरडण्यास भाग पाडू शकत असेल. पण प्रत्येक वेळी असे हाेत असेल तर स्वत:ला पाहणे सुद्धा आवश्यक हाेते. हे सुद्धा श्नय असेल की, हाेऊन गेलेल्या गाेष्टींविषयी निराशा किंवा कटू अनुभव तुमच्या आत जमा हाेत असतील. काही अवघड निर्णय असतील, जे घेण्यास तुम्ही माघार घेत असाल. काही जवळच्या नात्यांमध्ये येणारे बदल असतील, जे तुम्हाला त्रासदायक ठरत असतील.
काय करावे?: काही वेळ शांत व्हा. स्वत:ला विचारा की, समस्या परिस्थितीची आहे किंवा तुमची? असे तर नाही की, काही बाबी अशा आहेत, ज्या तुम्हाला भीती किंवा असुरक्षितपणाची जाणीव करून देत असतील. जर तुम्ही स्वत: समस्या साेडवू शकत नसाल तर आपल्या काेणा हितचिंतकांशी किंवा अनुभवींशी संभाषण करा.आपली काळजी घ्या आपण जितके जास्त व्यस्त हाेत जाताे, तित्नयाच प्रतिक्रिया सुद्धा जास्त देऊ लागलाे आहाेत. आराेग्याकडे दुर्लक्ष सुद्धा तितकेच केले जात आहे. शरीराला आरामही हवा आणि पाेषण सुद्धा. ताजी हवा, याेग्य आहार आणि थाेडा व्यायाम काेणत्याही प्रकारची ल्नझरी नाही तर आपल्या शरीराची आवश्यकता आहे. दीर्घ काळपर्यंत त्याकडे दुर्लक्ष करणे, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आपले वागणे आणि विचार करण्यावर, समजून घेण्यावर परिणाम करू लागते. एक व्य्नत न झालेला संताप आपल्यामध्ये वाढत जाताे.