भारतातील सत्तर टक्के बालमृत्यू कुपाेषणाच्या कारणांमुळे

    19-Sep-2024
Total Views |
 
 

hungry 
 
देशाच्या प्रगतीसाठी निराेगी आणि सशक्त नवीन पिढी आवश्यक असते. मुलांना लहानपणापासून उत्तम आणि पाैष्टिक आहार दिला, तर भविष्यात देशाच्या प्रगतीला त्यांचा हातभार लागताे. भारताचा विचार केला, तर मात्र चित्र चांगले नाही. सत्तर ट्न्नयांपेक्षा बालमृत्यू कुपाेषणामुळे हाेतात. 2021मध्ये देशात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या 0.7 दशलक्ष मुलांचा मृत्यू झाला. त्यातील 0.5 दशलक्ष मृत्यू बालके आणि माता कुपाेषणामुळे झाले हाेते. म्हणजेच, पाैष्टिक घटकांच्या कमतरतेमुळे 70 ट्न्नयांपेक्षा जास्त मृत्यू झाले. त्याच वर्षी जागतिक पातळीवर पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या 4.7 दशलक्ष मुलांचा मृत्यू झाला. त्यातील 2.4 दशलक्ष मृत्यू बालके आणि माता कुपाेषणामुळे झाले हाेते. म्हणजेच, सुमारे 50 टक्के मृत्यू पाेषक घटकांच्या कमतरतेमुळे झाल्याचे दिसते.बहुसंख्य प्रकरणांत मुलांचा मृत्यू कुपाेषणामुळे हाेत नाही, तर तशी स्थिती निर्माण झाल्यामुळे ही वेळ येते. त्यात विविध घटक येतात. उदा. जन्मत: कमी वजन असणे, बालकाला पुरेसे स्तनपान न मिळणे आदी.
 
मात्र, जन्मत: कमी वजन ही बाळांमधील मुख्य समस्या असल्याचे दिसले आहे. गर्भवतीला पुरेसे पाैष्टिक घटक न मिळाल्यामुळे बाळाचे वजन कमी हाेते. गराेदरपणाच्या काळात काही संसर्ग झाला असल्यास, त्याचाही परिणाम हाेताे. जन्मानंतरच्या पहिल्या काही आठवड्यांत कमी वजन अथवा मातेचे कुपाेषण झालेल्या बालकांना संसर्ग आणि विकारांची जाेखीम असते. अशी मुले निराेगी नसतात. ‘वेस्टिंग’च्या समस्येमुळे (म्हणजे उंचीच्या तुलनेत वजन फारच कमी असणे) किंवा ‘स्टंटिंग’मुळे (म्हणजे वयाच्या तुलनेत उंची अगदी कमी असणे) या दाेन कारणांनीसुद्धा अनेक मुलांचा मृत्यू हाेताे. कमी उत्पन्न असलेल्या देशांत कुपाेषणामुळे हाेणारे बालमृत्यू जास्त असून, संसर्गजन्य विकारांचा प्रादुर्भाव असलेल्या देशांमधील मुलांना पुरेसे पाैष्टिक घटक मिळत नाहीत. गरीब देशांतील बालमृत्यूंच्या तुलनेत श्रीमंत देशांत हे प्रमाण 20 ते 50 पट कमी आहे.सब-सहारन आफ्रिका आणि दक्षिण आशियाई देशांत कुपाेषणामुळे हाेणारे बालमृत्यू जास्त आहेत.