आपली कामाची जागा फार महत्त्वाची असते. दिवसातील बराच वेळ आपण तेथे असताे आणि साेबत सहकारी असतात. एकमेकांच्या मदतीने कामे पार पाडावयाची असल्याने आपण अप्रिय हाेणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. कामाच्या जागी आपण सगळ्यांचे आवडते असावे ही इच्छा साहजिक असली, तरी सगळ्यांची ती पूर्ण हाेत नाही. कामाचे यश आणि साैहार्दाच्या संबंधांसाठी आपण काेणाचे तरी आवडते असणे आवश्यक असते. नावडते ठरण्यामागे आपल्या काही चुका असतात. याची काही कारणे आहेत आणि वेळेत ओळखलीत तर त्यावर उपायही करता येतात. त्यातील काही महत्त्वाची कारणे पाहा.सतत तक्रारी करणे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असल्याने कामाच्या जागी काेण कसे वागेल हे ठामपणाने सांगता येत नाही.काहींचा स्वभाव सतत तक्रारी करण्याचा असताे.
कधी सहकाऱ्यांबाबत, कधी कामाबाबत, तर कधी व्यवस्थापनाबाबत असे लाेक वैतागलेले असतात. तुमचा स्वभावही तसा असेल, सावध व्हा. सतत तक्रारी करणे म्हणजे नकारात्मकता असून, त्यामुळे ऑफिसमधील वातावरण बिघडते. त्यामुळे सहकारी तुम्हाला टाळायला लागतात. काम म्हटल्यावर त्यात समस्या असणारच; पण तक्रारी करून त्या सुटत नाहीत, तर त्यावर उपाय शाेधावे लागतात. तुम्हाला काही समस्या असतील, तर त्यावर मार्ग शाेधा. संभाषणात कृतज्ञता आणि सकारात्मकता आणण्यामुळे वातावरण साैहार्दाचे हाेते. सहकाऱ्यांवरही त्याचा अनुकूल परिणाम हाेताे, असे युनिफेझ कॅपिटल इंडियाच्या एचआर विभागाच्या प्रमुख प्रियांका सचदेव यांनी सांगितले. दैनंदिन जीवन आणि कामामध्ये समस्या येण्यात नावीन्य काही नाही. पण, सतत निराशावादी सूर लावल्याने लाेक तुम्हाला टाळायला लागतात. काेणत्याही प्रसंगात कायम चांगली बाजू पाहा आणि सकारात्मक विचार ठेवा. तरच तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना आवडायला लागाल, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
आय काॅन्टॅ्नटचा अभाव एकमेकांच्या नजरेला नजर, म्हणजे डाेळ्यांना डाेळे भिडवून बाेलणे म्हणजे तुम्ही पसंत असणे. पण, तुमचे सहकारी तुमच्याबराेबर तसे बाेलत नसतील, तर तुमचे काही तरी चुकत असल्याचे लक्षात घ्या, असा सल्ला उद्याेजक आणि गुंतवणूकदार जिनय सावला यांनी दिला आहे. यावर उपाय म्हणजे, आपल्या नजरेला नजर न देणाऱ्यांना त्याची कारणे विचारणे हा असल्याचे ते म्हणतात. माझे काय चुकले, हे त्यांना विचारणे याेग्य असते. तुमच्या काही बाबी त्यांना खटकत असतील, तर ते त्या सांगतील आणि तुम्हाला सुधारणेची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या कामाबाबत गंभीर नसाल किंवा त्यात शिस्त नसेल, तर लाेक तुमच्या डाेळ्यांना डाेळे भिडविणे टाळतात. तुम्हाला तसे काेणी स्पष्ट सांगणार नसले, तरी त्यांच्या या कृतीतून तुम्ही ते ओळखा आणि स्वत:मध्ये सुधारणेचा प्रयत्न करा, असे सावला हे म्हणतात.
विश्वासाचा अभाव सगळे जग आणि आपले दैनंदिन व्यवहार चालतात ते विश्वासावर. तुम्हाला नाेकरी मिळणे म्हणजे तुम्ही ते काम करण्यास पात्र आहात हा विश्वास असणे. पण, त्यासाठी आपण काेणावर विश्वास ठेवणे आणि आपली वर्तणूक तशी असणेही आवश्यक असते. या दाेन बाबी नसतील, तर सहकारी तुम्हाला टाळतात. ‘राेझमूर’च्या संचालिका रिद्धिमा कंसल या म्हणाल्या, ‘विश्वासार्हता हा तुमची ओळख पटण्याचा एक प्रमुख मार्ग असताे. तुम्ही कसे आहात हे लाेक त्यावरून ओळखतात. उदा. तुम्ही कामाच ठरलेली डेडलाइन पाळत नसाल, बैठकीला उशिरा येत असाल आणि तुमच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पाळत नसाल, तर तुम्ही विश्वासार्ह नसल्याचे लगेच समजते.
एकदा विश्वास उडाला, तर ताे परत मिळविणे फार कठीण असते.’ यावर उपाय म्हणजे, आपली विश्वासार्हता वाढविणे. आपल्या कामाचे प्राधान्यक्रम निश्चित करून ती वेळेत संपविणे, जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडणे, पूर्ण करता येतील अशी व्यवहार्य लक्ष्ये ठेवणे आदी मार्ग त्यासाठी अमलात आणा. इतरांना मदत करण्यास तयार असणे हाही विश्वासार्ह ठरण्याचा मार्ग असताे, असा सल्ला त्यांनी दिला आहे.नकारात्मक बाॅडी लँग्वेज तुमची बाॅडी लँग्वेजही खूप काही सांगत असते.फुलीप्रमाणे ठेवलेले हात (क्राॅस्ड आर्म्स), नजरेला नजर भिडविणे टाळणे अथवा सपाट-निरस आवाजात बाेलणे ही लक्षणे तुमच्याबाबत शंका निर्माण करतात. माेकळ्या हालचाली, स्मित हास्य आणि सर्वांचे बाेलणे लक्षपूर्वक ऐकण्यासारख्या उपायांतून तुम्ही सहकाऱ्यांमध्ये तुमच्याबाबत आपुलकीची भावना निर्माण करू शकता.
सहानुभूतीशून्य वर्तणूक माेकळा संवाद आणि सहानुभूतीच्या वर्तनामुळे तुम्ही सहकाऱ्यांमध्ये प्रिय हाेता. तुमचे वर्तन सहानुभूतीशून्य असेल, तुम्ही तुमच्यापुरते पाहणारे असाल, तर सहकारी तुम्हाला टाळतात. ऑफिसमधील राजकारणात रस घेणारे आणि बदल स्वीकारण्यास नाखूश असलेले लाेक सहकाऱ्यांमध्ये अप्रिय हाेत असल्याचे ‘भारतलाेन’चे संस्थापक अमित बन्सल यांनी सांगितले. सर्वांचे बाेलणे लक्षपूर्वक ऐकणे आणि समस्येत त्यांना मदत करण्यामुळे हे चित्र बदलता येते. आपले बाेलणे विश्वास निर्माण करणारे हवे. कंपनीच्या नव्या याेजनांमध्ये सहभागी झालात, तर कंपनीच्या प्रगतीत तुम्हालाही रस असल्याचे दिसते.त्यामुळे अशा संधींचा लाभ जरूर घ्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे. तुमची वागणूक पारदर्शक असेल, त्यात काही लपवाछपवी नसेल, तर सहकारी तुमचा आदर करायला लागतात, असे ते म्हणाले.