करण जाेहर हा हिंदी सिनेमातला नामवंत निर्माता-दिग्दर्शक. त्याचबराेबर हाैशी अभिनेताही. ताे हाेस्टिंग अतिशयउत्तम करताे, नैसर्गिक गुणवत्ता आहे त्याच्यात.पण अभिनेता म्हणून ऑकवर्ड आहे. आदित्य चाेपडाच्या पदार्पणाच्या सिनेमात, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमात, ताे शाहरुख खानचा मित्र बनला हाेता. त्यानंतर त्याने अनुराग कश्यपच्या बाँबे वेल्वेट या सिनेमात कैझाद या खलनायकाची व्यक्तिरेखा साकारली.हा अनुराग कश्यपचा सगळ्यात महागडा सिनेमा.त्यात त्याने रणबीर कपूर, अनुष्का शर्मा यांच्यासारखे स्टार घेतले हाेते. प्रचंड महागडे सेट उभारले हाेते.
हा सिनेमा रिलीझ हाेणार हाेता, तेव्हा करणला वेगळीच चिंता लागून राहिली हाेती. त्याला पुरस्कारांची फार माेठी भूक आहे. कुठूनही, कसेही पुरस्कार हवे असतात त्याला. हिंदी सिनेमात त्याचं पदार्पण तर आधीच झालं हाेतं. पण, काही कारणाने लाेकांना त्याचा विसर पडावा आणि त्यांनी बाँबे वेल्वेट हाच आपला पदार्पणाचा सिनेमा गृहीत धरून आपल्याला सर्वाेत्तम पदार्पणाचे पुरस्कार द्यावेत, अशी त्याची इच्छा हाेती. असं अर्थातच झालं नाही, कारण बाँबे वेल्वेट हा सणकून आपटला. इतका जाेरात आपटला की त्या सिनेमाचा विषय काढताच करण सांगायला लागायचा, पण ताे माझ्या पदार्पणाचा सिनेमा नाहीच. मी डीडीएलजेसारख्या फार माेठ्या सुपरहिट सिनेमातून पदार्पण केलंय.