माेबाइलमुळे काेठूनही संपर्क साधणे श्नय झाले आणि स्मार्टफाेनने तर जगच बदलले.केवळ संपर्कच नव्हे, तर करमणूक, माहिती, विमान-रेल्वे प्रवासाच्या तिकिटांचे बुकिंग आदी अनेक जबाबदाऱ्या हा फाेन पार पाडत असल्याने ताे अत्यावश्यक झाला. पण, आत लाेकांना त्याचे व्यसन लागल्यासारखे झाले आहे. काेठेही पाहिलेत, तर बहुतांश लाेक स्मार्टफाेनच्या स्क्रीनमध्ये डाेके घातलेले दिसतील. हे व्यसन आता प्राैढांबराेबरच लहान मुलांपर्यंत पाेहाेचले आहे. मैदानावर खेळण्याऐवजी मुले टीव्ही अथवा फाेनमध्ये गुंतत चालली आहेत. याचा परिणाम त्यांच्या शारीररिक आणि मानसिक आराेग्यावर हाेत असल्यामुळे पालक चिंतेत आहेत. पण, काही प्रमाणात तेसुद्धा याला जबाबदार आहेत. मुलांना नकाे त्या वयात स्मार्टफाेनसारखी गॅजेट्स हाताळायला दिलीत, तर त्यांना सवय हाेणारच.दाेन मुलांची आई असलेली एक महिला या अनुभवातून गेली.
तिची मुलेही स्मार्टफाेन आणि टीव्हीच्या आहारी गेली हाेती. त्यांना या सवयीतून तिने कसे बाहेर काढले, काय समस्या आल्या याचा अनुभव या महिलेने सांगितला आहे. ताे सगळ्यांना उपयाेगी पडेल. ती काय सांगते ते बघा.ही महिला म्हणते, ‘माझा मुलगा चार वर्षांचा असताना आमच्या मुलीचा जन्म झाला. आपल्या मुलांना टीव्ही आणि माेबाइलचा नाद लागू द्यावयाचा नाही असे मी आणि पतीने ठरविले हाेते. मुलगा सहा वर्षांचा आणि मुलगी दाेन वर्षांची झाल्यावर आम्हाला स्वत:साठी वेळच मिळत नसल्याची जाणीव झाली. घरातील खर्च वाढत हाेते आणि सतत कामे करून आम्ही थकत हाेताे. त्यातून चिडचीड वाढली.आम्ही आमचा निर्णय बदलला. मुलांच्या खाेलीत टीव्ही बसविला आणि त्यांना माेबाइल दिला.’ ‘वाढत्या स्क्रीनटाइममुळे मुलांचे आयुष्यबदलून गेल्याचे दिसल्यावर ते पूर्ववत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. पण, हे बदल सावकाश करावे लागतील याची जाणीव आम्हाला हाेती,’ असे ही महिला सांगते. तिने काय उपाय केले ते पाहा.
1) मुलांचा स्क्रीनटाइम निश्चित करणे हा पहिला उपाय त्यांनी केला. मुलांना फक्त वीकेंडला दाेन तास फाेन वापरता येईल हे त्यांनी स्पष्ट केले. टीव्ही सायंकाळी 7 ते रात्री 9 या वेळेतच पाहावयाचा आणि रविवारी 7 ते 10 हेही सांगितले गेले.
2) शाळेतून आल्यावर दप्तर, जेवणाचा डबा आणि गणवेश जागेवर ठेवणे हा दुसरा उपाय.सायंकाळी आई स्वयंपाकघरात काम करत असताना मुले डायनिंग टेबलाजवळ बसून चित्रे काढणे किंवा अन्य काही छंदांमध्ये मन रमवायला लागली. पूर्वी या वेळी ती माेबाइलमध्ये गुंतलेली असत.
3) पालकांना उलट उत्तरे दिली किंवा मूर्खपणा केला, तर लगेच माफी मागावी लागेल हेही आई- बाबांनी स्पष्ट केले. माेठी चूक असेल, तर माफी मागण्याबराेबरच त्या दिवशी टीव्ही पाहता येणार नाही हेही बजावले गेले.
4) घरातील कामांसाठी मुलांची मदत घेणे सुरूकेले. शाळेतील प्राेजे्नट्सही पालकांची मदत न घेता त्यांनीच पूर्ण करावेत असे सांगितले.
5) नियमित वाचनासाठी वेळ निश्चित केली गेली. रात्री झाेपण्यापूर्वी आम्ही मुलांना गाेष्टी वाचून दाखविणे सुरू केले.
परिणाम
मी आणि माझ्या पतीने केलेले हे नियम काेणाला कडक वाटले, तरी त्यांचे परिणाम चांगले झाले आहेत. या नियमांमुळे प्रारंभी मुले नाराज हाेती.पण, सवय झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यांवर पूर्वीचे हास्य आले आणि ती खेळण्यांबराेबर खेळायलाही लागली.
मुलांना घरातील कामे करणे आवडायला लागले आणि आता ती अनेक कामे स्वत: करायला लागली आहेत.
फाेनच्या आहारी गेलेली असताना माेठ्या आवाजात बाेलणारी मुले आता शांतपणाने बाेलायला लगली आहेत.