जगातील सर्वांत पहिल्या दुर्बिणीचा शाेध एका छाेट्या मुलाच्या खेळण्यातून लागला. हाॅलंडमधील मिडलबर्ग येथे हॅन्स लिपरशे या माणासाचे चष्म्याचे दुकान हाेते. त्याच्या दुकानात एक मुलगा काचांशी खेळत हाेता. त्याने दाेन बर्हिगाेल भिंगे एकमेकांसमाेर धरून बघितली आणि त्याच्या दृष्टीने एक आश्चर्याची घटना घडली. दूरवरील झाड त्याला अगदी जवळ आल्याचे दिसले. त्याने दुकानाच्या मालकाला म्हणजे हॅन्सला ही गाेष्ट दाखवली.हॅन्सला खूपच आनंद झाला. त्याने भिंगाचा वापर करून दूरच्या वस्तू जवळ दाखवणारी खेळणी बनवली.या खेळण्यांची कीर्ती इटलीतल्या गॅलिलिओ गॅलिली यांच्या कानावर गेली. त्याने मग माेठी भिंगे वापरून माेठी दुर्बिण तयार केली.त्यातून त्याने सर्वप्रथम आकाशातील ग्रहताऱ्यांचे निरीक्षण केले. ते वर्ष हाेते, इ.स. 1610. गॅलिलिओने गुरू ग्रहांचे चार चंद्र, चंद्रावरील (पृथ्वीची) विवरे, पर्वत यांचे निरीक्षण केले. काळ्या काचेच्या मदतीने, त्याने सूर्यावरील डागांचे देखील निरीक्षण केले असल्याचे त्यात नमूद केलेले आहे.