मध्य ग्रीसमधील माॅर्नाेस तलाव काेरडा पडल्यानंतर तलावात 45 वर्षांनी संपूर्ण गाव सापडले आहे. हिवाळ्यात पुरेसा बर्फ नव्हता आणि उष्णता खूप हाेती. अपुऱ्या पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली.अर्ध्या ग्रीसला मानवनिर्मित सराेवरातून पाणीपुरवठा केला जात हाेता. मात्र, दुष्काळामुळे तलाव काेरडा पडला. ग्रीसची राजधानी अथेन्समधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी 1980मध्ये 200 किलाेमीटर अंतरावर तलाव बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, काळेओ नजीकचे हे गाव त्यात गेले असावे. तलावाच्या तळापासून घराच्या विटांच्या भिंती सापडल्या आहेत.