जनजागृती होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कोथरूडतर्फे माहितीपर बॅनरचे अनावरण

    10-Sep-2024
Total Views |
 
 
ro
 
पुणे, 9 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झालाय. या उत्सवातून जनजागृती व्हावी, अशी लोकमान्य टिळकांची इच्छा होती. जगभरात मोठ्या प्रमाणात लोकसेवेचे कार्य करणाऱ्या रोटरी संस्थेने या निमित्ताने जनजागृतीला हातभार लावला. रोटरी क्लब पुणे कोथरूडने अखिल मंडई मंडळाच्या गणपती उत्सवाच्या मंडपात रोटरीच्या कामांची माहिती देणाऱ्या बॅनरचे अनावरण केले. तसेच, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. शितल शहा यांच्या हस्ते आरती केली. या प्रसंगी रोटरी क्लब कोथरूडचे अध्यक्ष रो. मनिष दिडमिशे, डायरेक्टर हेमचंद्र दाते व इतर माननीय सभासद उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा सत्कार अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी केला. रोटरी क्लब पुणे कोथरूडतर्फे रोटरीच्या कामांची माहिती देणारे बॅनर 10 प्रमुख जागी लावण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रोटरीच्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोचावी आणि जनजागृती व्हावी, असा उद्देश या मागे आहे.