पादत्राणांची निवड विचारपूर्वक करा

    08-Aug-2024
Total Views |
 
 

shoes 
 
 दिवसा अशा पादत्राणांची निवड करा, ज्यास तीन सेंटीमीटरची टाच असेल, ज्यामुळे तुमच्या पंजाची व्यवस्थित हालचाल हाेण्यास मदत हाेईल किंवा चपलेला लेस किंवा बक्कल असावे.
 
 लक्षात ठेवा, माेजे आणि टाइट्स असे असावेत ज्यामध्ये तुम्ही पायांची हालचाल सहजपणे करू शकाल.
 
 एकच जाेड सलग दाेन-तीन दिवस घालू नका. टाचांची उंची बदलत राहण्याने पायांनाही आराम मिळताे.
 
 पार्टीमध्ये उंच टाचांच्या चप्पल घालणे ठीक आहे, पण जर तुम्ही िफरायला किंवा ड्रायव्हिंगला जात असाल तर उंच टाचेच्या चप्पल घालणे टाळा.
 
 सध्या दिवसभर स्पाेर्ट शूज घालण्याची फॅशन आहे.अर्थातच अशा शूजमुळे छान आधार मिळताे. पण यामुळे तुमच्या पायांची स्थिती अ‍ॅथलीटच्या पायाप्रमाणे हाेते.
म्हणून स्पाेर्ट शूज एका तासापेक्षा जास्त घालू नका.
 
 कॅनव्हाॅसच्या शूजमुळे पायांना हवा मिळते. कॅनव्हाॅसचे शूज चालण्यासाठी उत्तम आहेत, पण खूप वेळ घालणं टाळा.
 
 तुमच्या पायांकडे नियमितपणे लक्ष देऊन तुम्ही हे तपासू शकता की, काेणत्या पादत्राणांमुळे तुम्हाला आरामदायक वाटते. पाय लाल हाेणे, पायाच्या तळव्यावर काॅर्न हे या गाेष्टीचे संकेत आहेत की, तुमचे पाय अधिक दबावाखाली आहेत.
 
 अनवाणी पायांनी कधीही िफरू नका