सारे माहीत असूनही आज तणाव, दु:ख व सर्वांत महत्त्वाचे नैराश्य का आहे? ज्ञान एवढे आहे की, ते ऐकले वा वाचले जाते व इतरांनाही ऐकवले जाते. एखादा उत्तम मेसेज येताे तेव्हा आपण फटाफट सर्वांना फाॅरवर्डही करताे. आपला हेतू चांगला असताे की लाेकांनी ताे वाचावा व किती चांगली गाेष्ट आहे हे जाणून घ्यावे, पण आपण ऐकताे, पाहताे, वाचताे व शेअर करताे, पण या सर्वांपेक्षा चांगली गाेष्ट म्हणजे प्रथम ती आपल्या जीवनात लागू करायला विसरताे.एवढी समज आपल्याकडे असूनही आपण त्याचा कधी वापर करीत नसताे. जेव्हा आपण मानसिक स्वास्थ्य व नैराश्याबाबत बाेलताे तेव्हा ती लागूही करायला हवी. जर एखाद्याला विचारले की आपल्याला डिप्रेशन आहे का, तर क्वचितच काेणी म्हणणार नाही की, हाे मला आहे. तर मग त्रासही काेण्या दुसऱ्यालाच आहे आणि लक्षही त्यालाच द्यायचे आहे.
तर मग आपण त्यात आलाे काेठून? परिस्थितीबाहेर येतात व लाेक वेगवेगळ्या प्रकारे वागतात तेव्हा आपण आजारी तर पडत नाही. काेणी दुसराच त्रस्त हाेताे, नाराज हाेताे तेव्हा आपण त्याचे संक्रमण तर घेत नाही ना. आपण आपली भावनिक परिस्थिती समजायला हवी. एखादी गाेष्ट मला खूप माेठी वाटते वा छाेट्या गाेष्टी हल्नया करून संपवत असताे. आपल्या विचार व भावनांवर आपल्या काेणत्या प्रतिक्रिया आहेत? प्रत्येक परिस्थितीत आपला व्यवहार कसा असताे? एखादा आपल्याशी व्यवस्थित बाेलला नाही तर त्यावेळी आपल्याला कसे वाटते? काेणी विचारले की काय कसं काय चाललंय? तर आपण म्हणताे की, ‘बस चाललं आहे.’ जीवन उत्तम चालले आहे तर काय अडचण आहे. कधी कधी राग येताे. कधी कधी थाेडेसे रडूही येते. कधी कधी थाेडे वाईट वाटते तर यात चूक काय आहे? हे तर सामान्यच आहे, तर मी सरासरी तब्येतीसाेबत जीवन जगू शकता, पण त्या सर्वसामान्य तब्येतीत जर अचानक काही थाेडी माेठी परिस्थिती येते,.
तेव्हा माझे सर्वसामान्य स्वास्थ्य कधी कधी ते सहन करू शकत नाही. उदा. जरी माझा पाय दुखत असला तरी मी चालू शकताे. हे खूप साेपे आहे. हे एवढे साेपे आहे की, याला मी माझ्या जीवनाचा भाग बनवून घेताे. ठीक नाही झाला तरी चालत राहताे, पण एखाद्या दिवशी पळायचे असेल तर त्याच पायांनी आपण पळू शकत नाही आणि आपण पडताे.तेव्हा मला उभे राहण्यासाठी एखाद्याच्या आधाराची गरज असते. काही अशा वेदना असतात की, ज्या आपण आतून स्वीकारताे आणि आपण जीवन त्यासाेबतच चालवत राहताे. राग करणे सामान्य आहे. तणाव सामान्य आहे. दु:खी हाेणेही सामान्य आहे. काेणी काही बाेलले तर वाईट वाटणे स्वाभाविक आहे. या साऱ्या गाेष्टी एक आजार आहे. ते फक्त एक मेंटल हेल्थचे प्रकरण नसून हे वाईट इमाेशनल हेल्थचे प्रकरण आहे.