एका बावीस वर्षीय नायजेरियन तरुणाने 24 तासांत सर्वाधिक फास्ट फूड रेस्टाॅरंटमध्ये खाण्या- पिण्याचा नवे गिनिज वर्ल्ड रेकाॅर्ड केले आहे. मुनाचिमसाे ब्रायन न्वाना नावाच्या कंटेंट-निर्माता आणि फूड-सल्लागाराने 24 तासांत 150 रेस्टाॅरंटला भेट देऊन हा विश्वविक्रम केला आहे. मागील वर्षी 100 रेस्टाॅरंटचा जागतिक विक्रम अमेरिकन YoTubशी इराकने केला हाेता. इराकने हा विक्रम न्यूयाॅर्क शहरात केला, तर ब्रायनने नायजेरियाची राजधानी अबुजा येथे हा विक्रम केला.गनिज वर्ल्ड रेकाॅर्डच्या नियमांनुसार, हा विश्वविक्रम करण्याच्या प्रक्रियेदरम्यान खासगी वाहनांना एका रेस्टाॅरंटमधून दुसऱ्या रेस्टाॅरंटमध्ये जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे ब्रायनने सुमारे 25 किलाेमीटर चालत ही कामगिरी केली. ब्रायनने 24 तासांचा प्रवास संध्याकाळी 5 वाजता सुरू केला.गिनिज वर्ल्ड रेकाॅर्डच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक रेस्टाॅरंटमध्ये किमान एक खाद्यपदार्थ किंवा पेय खाणे किंवा पिणे आवश्यक हाेते.75 टक्के ठिकाणी खाद्यपदार्थ आणि उर्वरित ठिकाणी पेये मागवता येतील असाही नियम हाेता.