म्हाडाच्या 370 सदनिकांच्या किमतीत 25 ट्नकेपर्यंत कपात

    30-Aug-2024
Total Views |
 

Mhada 
 
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी आयाेजित संगणकीय साेडतीतील विकास नियंत्रण नियमावली 33 (5) व 33 (7) व 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून गृहसाठा म्हणून प्राप्त झालेल्या 370 सदनिकांच्या विक्रीची किंमत 10 ते 25 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येत असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली.म्हाडाच्या मुंबई मंडळ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज नाेंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला 19 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही सावे यांनी सांगितले. नवीन व मागील साेडतीतील या सदनिका पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून म्हाडाला गृहसाठा म्हणून सदनिका प्राप्त असून, अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती 25 टक्क्यांनी, अल्प उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती 20 टक्क्यांनी, मध्यम उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती 15 टक्क्यांनी, तर उच्च उत्पन्न गटातील सदनिकांच्या किमती 10 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचे सावे यांनी सांगितले.
 
आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात म्हाडाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांशी जनसंवाद सुलभ व पारदर्शक राहावा, या उद्देशाने म्हाडातर्फे निर्मिती करण्यात आलेल्या शुभंकर चिन्हाचे अनावरणही सावे यांच्या हस्ते म्हाडा मुख्यालयात करण्यात आले. म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बाेरीकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर, मुख्य अभियंता शिवकुमार आडे, सह मुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियाेजनकार पी.
डी. साळुंखे, सह मुख्य अधिकारी उमेश वाघ, काेकण मंडळाचे मुख्य अधिकारी अनिल अंकलगी, विधी सल्लागार मृदुला परब, उपमुख्य अधिकारी (पणन) राजेंद्र गायकवाड, गृहनिर्माण विभागाचे उपसचिव अजित कवडे, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बाेडके आदी यावेळी उपस्थित हाेते.