आदिवासींना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध याेजना राबवल्या जातात. आदिवासी बांधवांच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध याेजनांचा लाभ पाेहाेचवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधा आणि उत्तम सेवा देऊन आदिवासी पाड्यांचे आदर्श गावांत रूपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केली.आदिवासी जिल्ह्यांत प्रायाेगिक तत्त्वावर आदर्श आदिवासी गाव तयार करणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणे या विषयांबाबत राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली राजभवनात बैठक झाली.
आदिवासी विकास मंत्री डाॅ. विजयकुमारगावित, आराेग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्ताेगी, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगाेपाल रेड्डी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, काैशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, राज्य खादी व ग्रामाेद्याेग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भाेज, आदिवासी विकास आयु्नत नैना गुंडे, आदिवासी विकास वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसाेड, आदिवासी संशाेधन, प्रशिक्षण संस्थेचे आयु्नत डाॅ.राजेंद्र भारुड, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीण दराडे, पाेपटराव पवार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.