भारतात माेठ्या संख्येने लाेक प्राैढ वयातच गुडघेदुखीसारख्या समस्येशी झुंजत आहेत. काही केसेसमध्ये तर लाेक व्यवस्थित चालूही शकत नाहीत वा चालता चालता नेहमी पडतात. वास्तविक ही अस्थिछिद्रता (ऑस्टियाेपाेराेसिस) नावाची अवस्था आहे. ज्यामध्ये हाडांचे घनत्व कमी हाेते व ती भुसभुशीत हाेतात.हल्नयाशा ध्न्नयानेही ती तुटण्याचाी श्नयता वाढते.एक माेठी समस्या ही आहे की या स्थितीत ताेपर्यंत काेणाचे लक्ष जात नाही जाेपर्यंत एखादा गंभीर मार लागत नाही. ही स्थिती जगात पन्नाशीनंतरच्या सुमारे एक तृतीयांश महिला व 20 टक्के पुरुषांना प्रभावित करते.भारतात सुमारे सहा काेटी लाेक ऑस्टियाेपाेराेसिसने प्रभावित आहेत.ऑस्टियाेपाेराेसिसची अनेक कारणे असतात- उदा.हार्माेनल बदल, व्यायामाचा अभाव, मादक पदार्थांचे सेवनआणि धूम्रपान. पण भारतात आणखी एक कारकाचा यात समावेश आहे, ते म्हणजे हवेचे प्रदूषण. अध्ययनातून दिसून आले आहे की, उच्च प्रदूषण स्तराच्या क्षेत्रांत ऑस्टियाेपाेराेसिसचा प्रकाेप जास्त आहे.
भारतीय शहरे व गावे आपल्या प्रदूषित हवेसाठी कुख्यात आहेत. यामुळे संशाेधक धुके व ठिसूळ हाडांमधील जैविक संबंध तपासत आहेत.ऑस्टियाेपाेराेसिस शब्द 1830 च्या दशकात फ्रेंच राेगशास्त्रज्ञ जीन लाेबस्टाेनने दिला हाेता. वैज्ञानिकांनी हाडांच्या क्षतीची प्रक्रिया आणि अनेक जबाबदार कारके ओळखली आहेत. 2007 मध्ये नार्वेत केलेल्या एका अध्ययनाने पहिल्यांदा हवाप्रदूषण व हाडांच्या घनत्वेतील कमतरतेतील संबंधाचे संकेत दिले हाेते. यानंतर निरनिराळ्या देशांमध्ये केलेल्या संशाेधनांनीही हा संबंध प्रमाणित केला आहे.2017 मध्ये इकाॅन स्कूल ऑफ मेडिसिनचे डिडियर प्राडा आणि त्यांच्या टीमला ईशान्य यूएसच्या 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 92 लाख व्यक्तींच्या डेटा विश्लेषणात सूक्ष्म कणपदार्थ (पीएम 2.5) आणि ब्लॅक कार्बनच्या जास्त संपर्कात राहिल्यामुळे हाडांच्या फ्रॅ्नचर व ऑस्टियाेपाेराेसिसच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. यानंतर 2020 मध्ये केलेल्या संशाेधनाने रजाेनिवृत्त महिलांमध्ये ऑस्टियाेपाेराेसिसच्या कारकांच्या यादीत आणखी एक मुख्य प्रदूषक नायट्राेजन ऑ्नसाइड जाेडला.
यूकेत सुमारे साडेचार लाख लाेकांच्या आकडेवारीच्या विश्लेषणातून समजले की जास्त प्रदूषित क्षेत्रांमध्ये राहणाऱ्यांमध्ये फॅ्नचरची जाेखिम 15 टक्के जास्त हाेती. अशाप्रकारे दक्षिण भारताच्या एका अध्ययनात आढळून आले की, जादा प्रदूषित गावांच्या रहिवाशांच्या हाडांमध्ये खनिज व हाडांचे घनत्व खूप कमी हाेते.चीनमध्येही हवाप्रदूषण व ऑस्टियाेपाेराेसिसमध्ये संबंध पाहिला गेला. शॅंडाेंग प्रांतात केलेल्या एका अध्ययनातून कळले की, थाेड्या काळासाठीही रहदारीसंबंधित प्रदूषकांच्या संपर्कात आल्यामुळे ऑस्टियाेपाेराेसिसजन्य फॅ्र्नचरचा धाेका वाढताे. एका इतर अध्ययनाचा निष्कर्ष आहे की, ग्रामस्थांनाही अशा प्रकारच्या जाेखमींचा सामना करावा लागताे.सध्या संशाेधक प्रदूषक कशाप्रकारे हाडांचे नुकसान करू शकतात हे समजण्याचा प्रयत्न करीत आहेत.
यात एक प्रत्यक्ष कारक जमिनीलगत आढळणारा ओझाेन आहे. जाे प्रदूषणाचे कारण निर्माण करताे. हा व्हिटॅमिन डीच्याउत्पादनासाठी आवश्यक अतीनीलप्रकाश कमी करू शकताे जाे हाडांच्या विकासासाठी आवश्यक आहे.पेशीय स्तरावर प्रदूषकमुक्त मूलक बनते जे डीएनए आणि प्राेटीनचे नुकसान करते. सूज वाढवते व अस्थिउतकांच्या नूतनीकरणात बाधा आणते.हे निष्कर्ष भारतासाठी खूप महत्त्वाचे आहेत, जिथे 1998 ते 2021पर्यर्ंत कणीय हवा प्रदूषण सुमारे 68 टक्के वाढले आहे. जीवाश्म इंधन व शेती अवशेष जाळण्यासाेबत चुलींवर स्वयंपाकाने समस्या वाढते. आजही अनेक भारतीय महिला पारंपरिक चुलींवर स्वयंपाक करतात. ज्यामुळे त्यांच्या हाडांची स्थिती खालावू शकते.प्रदूषण व ऑस्टियाेपाेराेसिसमध्ये या संबंधाने प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी कारवाईची गरज स्पष्ट आहे.याशिवाय ऑस्टियाेपाेराेसिसचे निदान उत्तम करणे आवश्यक आहे