ट्रायजेमिनल न्यूरल्जिया डिसीजवर उपचार शक्य

23 Aug 2024 14:07:27
 
 
dr
 
 
ट्रायजेेमिनल न्यूरल्जिया वा सुसाइड डिसीज एक प्रकारची अत्यंत तीव्र आणि वेदनामय समस्या असून, चेहऱ्याच्या मज्जातंतूंवर परिणाम करते. यात अचानक आणि तीव्र वेदना होतात, ज्या गाल वा जबड्यासारख्या एका भागात होतात. ही वेदना विजेच्या झटक्याप्रमाणे वा टोचल्याप्रमाणे असते. अनेकांनी या आजाराला वैतागून आत्महत्याही केली आहे. पण, लोकांना हे कळत नाही, की या आजारावर उपचार आहे. ट्रायजेमिनल न्यूरल्जिया बहुधा 40 ते 70 वर्षे वयात पाहायला मिळतो. ही माहिती पुण्यातील प्रतिष्ठित न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी दै. ‌‘संध्यानंद' प्रतिनिधीशी बोलताना दिली. वाचकांसाठी त्यातील काही विशेष भाग येथे देत आहोत.
 
 प्रश्न : आपण मूळचे कुठले आणि कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे?
उत्तर : माझा जन्म पुण्यातच झाला. आम्ही मूळचे अकलूजजवळील माळशिरस गावचे. माझे वडील सत्यशील पंचवाघ आणि आई पद्मा आता आमच्यामध्ये राहिले नाहीत. सध्या माझ्यासोबत पत्नी डॉ. मालती आणि मुलगा सुहृद आहे. माझी पत्नी ॲनेस्थेसियोलॉजिस्ट आणि पॅरिऑपरेटिव्ह फिजिशियन आहे. मुलगा नुकताच एमबीबीएस झाला असून, तो न्यूरोच्या शिक्षणासाठी सध्या अमेरिकेत आहे.
 
प्रश्न : आपल्या शिक्षणाविषयी माहिती द्या.
उत्तर : माझे प्राथमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूलमधून झाले. यानंतर दोन वर्षे फर्ग्युसन कॉलेजमध्ये होतो. यानंतर मी एमबीबीएस बी.जे. मेडिकल कॉलेजमधून केले, नंतर तर केईएममधून सर्जरीचे शिक्षण घेतले. यानंतर मी 3 वर्षे मुंबई केईएममधून न्यूरोसर्जरी फोकस्ड ट्रेनिंग घेतले. मी नॅशनल इन्स्टिट्यूट आणि जर्मनीतूनही न्यूरोचे शिक्षण घेतले आहे. प्रश्न : मेडिकलचे शिक्षण घेण्याचे आपले काही खास कारण? आपण न्यूरोसर्जरीच आपले स्पेशलाइज्ड क्षेत्र का निवडले? उत्तर : माझे असे मत आहे, की मेडिसिनच असे क्षेत्र आहे, जे लोकांसाठी सायन्सचा वापर करण्याची संधी देते. मी जेव्हा मेडिकलचा अभ्यास करीत होतो तेव्हापासूनच मला कळले, की आपला मेंदू एक असा ऑर्गन आहे, जो पूर्ण शरीराला नियंत्रित करतो. मी नेहमीच शरीराच्या मुख्य ऑर्गनवर काम करू इच्छित होतो. मी नेहमी पुस्तकांनाच आपले गुरू मानले आहे तसेच माझ्या शिक्षकांकडून मला मोठे ज्ञान मिळाले आहे.
 
प्रश्न : न्यूरोसर्जनची प्रॅक्टिस करीत आपल्याला किती वर्षे झाली? एवढ्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये या क्षेत्रात कोणते बदल झाले आहेत?
उत्तर : मी 1998 पासून न्यूरोसर्जनची प्रॅक्टिस करीत आहे. एवढ्या वर्षांत या क्षेत्रात अत्यंत सकारात्मक बदल झाले आहेत. सर्वांत जास्त बदल टेक्नालॉजीत झाले आहेत, ज्यामुळे सहजता वाढली आहे. अन्यथा पूर्वी एक्स रे, सीटी स्कॅन आणि एमआरआयची सोय नव्हती तसेच सर्वांत विशेष अँटिबायोटिक्स आणि मायक्रोस्कोप नव्हते. आपल्याकडे आज जी सुविधा आणि मायक्रोस्कोप्स आहेत ते अत्यंत सुविधाजनक आहेत. यातून आतील ऑर्गन अत्यंत स्पष्ट दिसून येतात. ज्यामुळे सर्जरी करणे सोपे झाले आहे. सध्या मेंदूत एंडोस्कोपी केली जाते, जी 20 वर्षांपूर्वीपर्यंत अशक्य होती. या अत्याधुनिक टेक्नोलॉजीमुळे सर्जरीचे परिणामही उत्तम येतात. सध्या आमच्या क्षेत्रात एआय आधारित उपकरणही आले आहे आणि यामुळे नेव्हिगेशन सोपे झाले आहे.
 
प्रश्न : न्यूरोसर्जरीत आपल्याला रस कशात आहे?
उत्तर : न्यूरोसर्जरी अत्यंत कठीण ब्रँच आहे. यात मेंदू आणि पाठीचा कणाच्या (स्पाइन) विविध सर्जरी येतात. या क्षेत्रात माझा रस न्यूरोएंडोस्कोपीत आहे. पुण्यात मीच पहिल्या न्यूरोएंडोस्कोपी, स्पाइनलएंडोस्कोपीची सुरुवात केली. आताही आम्ही जी एंडोस्कोपी गाइडेड मायक्रोन्यूरो सर्जरी करतो त्याचे सर्वांत श्रेष्ठ एंडोस्कोप आमच्याकडे आहे. याचे परिणामही खूपच चांगले आहेत. या क्षेत्रात माझा रस मायक्रोव्हॅस्क्युलर डिकंप्रेशन (एमव्हीडी) सर्जरीत आहे. यानंतर माझा इंटरेस्ट एरिया ब्रेन ट्यूमर व स्पाइन सर्जरीत आहे.
 
प्रश्न : मायक्रोव्हॅस्क्युलर डिकंप्रेशन सर्जरी म्हणजे काय आणि यादरम्यान कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो? उत्तर : आपल्या मेंदूचा खालचा मानेचा भाग आहे तिथे मेंदूतून निघणाऱ्या नसा निघतात आणि चेहरा, डोके आणि मानेच्या विविध भागांत जाणीव व मोटर काम करतात. एकूण 12 जोड्या क्रेनियल नर्व्ह्‌‍स असतात आणि जेव्हा एखादी ब्लडव्हेसल (रक्तवाहिनी) नर्व्हच्या एखाद्या विशिष्ट जागी शिरते आणि जेव्हा तेच क्षेत्र व्यक्तीचे जन्मजात कमकुवत राहते, तेव्हा या दोन्हींच्या मिलाफाने व्यक्तीला समस्यांचा सामना करावा लागतो. सुरुवातीला तर व्यक्तीला ट्रायजेेमिनल न्यूरल्जियाशी लढावे लागते. ज्यामध्ये क्रेनियल नर्व्ह्‌‍सची जी पाचवी ट्रायजेेमिनल नर्व्ह असते त्यात ब्लड व्हेसल घुसते आणि त्यातून जे पल्सेस होतात ते नर्व्हला सतत धडकतात. ज्यामुळे व्यक्तीला असह्य वेदना होतात आणि यात विजेच्या झटक्याप्रमाणे वेदना होतात. याला ट्रायजेेमिनल न्यूरल्जिया वा सुसाइड डिसीज म्हणतात. ट्रायजेेमिनल न्यूरल्जियात व्यक्ती जेव्हा ब्रश करू इच्छिते वा चेहरा साफ करू इच्छिते तेव्हा हवेचा दाब पडतो. पुरुष जेव्हा शेव्हिंग करतो वा स्त्री जेव्हा केस विंचरते तेव्हा एक तीव्र वेदना होते. जी काहीच मिनिटे राहते, पण असह्य असते. हा अत्यंत गंभीर आजार आहे, पण सध्या हा गंभीर आजार ट्रीटेबल आहे. एमव्हीडी सर्जरीने याचा उपचार केला जातो. या सर्जरीत मायक्रोस्कोप आणि एंडोस्कोपचा वापर केला जातो. ज्याचा हेतू नर्व्हवर दबाव टाकणाऱ्या रक्तवाहिन्या हटवणे असतो. ही सर्जरी ट्रायजेमिनल न्यूरल्जिया वा हेमिफेशियल स्पास्मच्या केसमध्ये केली जाती. यामध्ये आव्हान हे असते, की लोकांमध्ये या आजाराविषयी जागरुकता नाही. तसेच या आजारामुळे अनेकांनी सुसाइडही केले आहे, कारण वेदना एवढ्या तीव्र असतात, की व्यक्तीला शुद्ध राहत नाही.
 
प्रश्न : ट्रायजेेमिनल न्यूरल्जिया काय आहे? याचा उपचार काय असू शकतो? हा मेंदूचा रोग कोणत्या वयोगटात जास्त पाहायला मिळतो?
उत्तर : ही एक प्रकारची अत्यंत तीव्र आणि वेदनामय समस्या असून, चेहऱ्याच्या मज्जाप्रणालीवर परिणाम करते. यात चेहऱ्याच्या गाल वा जबड्यासारख्या एका भागात अचानक व तीव्र वेदना होतात. या वेदना विजेच्या झटक्यासारख्या वा टोचल्यासारख्या जाणवतात. उपचारात औषधे दिली जातात, जी नर्व्हच्या वेदना नियंत्रित करण्यास मदत करतात. जर औषधे प्रभावी नसतील तर सर्जिकल पर्यायाचा विचार करता येऊ शकतो. उदा. मायक्रोव्हॅस्क्युलर डिकंप्रेशन, ज्यात नर्व्हवर दबाव टाकणाऱ्या रक्तवाहिन्या नीट केल्या जातात. ट्रायजेेमिनल न्यूरल्जिया बहुधा 40 ते 70 वर्षे वयांत पाहायला मिळतो.
 
प्रश्न : आत्तापर्यंत आपण किती मायक्रोव्हॅस्क्युलर डिकंप्रेशन सर्जरी केल्या आहेत? ही करण्यास किती वेळ लागतो? या सर्जरीनंतर रुग्ण किती दिवसांत रिकव्हर होतो आणि त्यांना कोणता सल्ला दिला जातो?
उत्तर : मायक्रोव्हॅस्क्युलर डिकंप्रेशन सर्जरी ट्रायजेेमिनल न्यूरल्जिया वा हेमिफेशियल स्पास्म ज्याला डोळा मारण्याचा आजार म्हणतात, त्यात केली जाते. या हेमिफेशियल स्पास्ममध्ये व्यक्तीच्या चेहऱ्याच्या एका भागाचा गाल वारंवार डोळ्यांसोबत ताणला जातो. जे समोरच्याला दिसते. या आजाराला डोळा मारणारा आजारही म्हणतात. आत्तापर्यंत हेमिफेशियल स्पास्ममधील स्थितीत 650 एमव्हीडी सर्जरी आणि ट्रायजेेमिनल न्यूरल्जियात 1800 सर्जरी केल्या आहेत. एक एमव्हीडी सर्जरी करण्यास 2 ते 3 तास वेळ लागतो. रुग्णाला सर्जरीनंतर 24 तासांनंतर चालण्या-फिरण्याची परवानगी असते. सर्जरीच्या चौथ्या दिवशी रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो आणि सर्जरीनंतर 2 आठवड्यांनी तो आपली कामे करू शकतो.
 
प्रश्न : पुण्यात एकूण किती न्यूरोसर्जन आहेत?
उत्तर : पुण्यात सध्या 100पेक्षा जास्त न्यूरोसर्जन आहेत.
 
प्रश्न : मेंदू सुदृढ व निरोगी राखण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात?
उत्तर : कोणत्या ना कोणत्या कामात ॲक्टिव्ह राहिल्यास, मेडिटेशन, एक्सरसाइजनेही मेंदू सुदृढ आणि निरोगी राहतो.
 
प्रश्न : न्यूरोसर्जरीच्या क्षेत्रात व्यावसायिकांच्या विकास आणि शिक्षणासाठी आपण कोणता सल्ला द्याल?
उत्तर : न्यूरोसर्जरीचे क्षेत्र हलक्यात निवडू नये. विचारपूर्वक या क्षेत्रात यायला हवे. मेेंदू शरीराचा सर्वांत मुख्य अवयव आहे. त्यामुळे या अवयवाची देखभाल गांभीर्याने घ्यायला हवी. यात ढिलाई वा बेपर्वाईचा परिणाम गंभीर होऊ शकतो. या क्षेत्रात येणाऱ्या इच्छुक लोकांनी वैयक्तिक रुपात मजबूत आणि सक्रिय व्हायला हवे. 
 
संपर्क : डॉ. जयदेव पंचवाघ, न्यूरोसर्जन 102, भाग्यतारा अपार्टमेंट, एरंडवणे सेंट्रलसमोर, गुळवणी महाराज रोड, एरंडवणे, पुणे. मोबाइल नंबर - 9011333841 ईमेल - brainspine66@gmail.com
Powered By Sangraha 9.0