मुंबई पालिकेत कार्यकारी सहायक पदांची भरती

23 Aug 2024 14:03:50
 
 
mu
 
मुंबई, 22 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
मुंबई महापालिकेत लिपिक पदासाठी मोठी भरती होणार आहे. ‌‘कार्यकारी सहायक' (पूर्वीचे पदनाम : लिपिक) या संवर्गातील 1846 जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली आहे. या जागांसाठी 9 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या 1846 पदांमध्ये अनुसूचित जाती (142), अनुसूचित जमाती (150), विमुक्त जाती-अ (49), भटक्या जमाती-ब (54), भटक्या जमाती-क (39), भटक्या जमाती-ड (38), विशेष मागास प्रवर्ग (46), इतर मागासवर्ग (452), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (185), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (185), खुला प्रवर्ग (506) याप्रमाणे भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
 
तसेच, या पदांचे समांतर आरक्षणानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. पालिकेच्या संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/ portal/anonymous/qlrn या लिंकवर या पदासाठीची संपूर्ण जाहिरात, अटी व शर्तींसह प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिरातीत ऑनलाइन अर्जाची लिंक (यूआरएल) देण्यात आली असून, त्यावर क्लिक केल्यानंतर इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता येईल. त्यानुसार 9 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजून 59 मिनिटांपूर्वीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. तसेच, त्यांचे काटेकोर पालन करून विहित नमुन्यातील ऑनलाइन अर्ज विहित वेळेत सादर करावा. तसेच, भरलेल्या संपूर्ण अर्जाची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी 9513253233 हा मदतसेवा क्रमांक देण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0