काळ बदलला, आपण तंत्रज्ञानात प्रगती केली तरी समाजाची मानसिकता अद्याप जुन्याच काळात असल्याचे दिसते. सध्याच्या काळात मुली उत्तम आणि उच्च शिक्षण घेत असल्यामुळे लग्नानंतरही त्या नाेकरी करतात अथवा आपला काही व्यवसाय सुरू करतात. काही जणी मात्र संपूर्ण वेळ गृहिणी हाेणे पसंत करतात. ही जबाबदारी साेपी मुळीच नाही.संपूर्ण घरातील जबाबदाऱ्या पेलताना या गृहिणींना किती धावपळ करावी लागते ते त्यांनाच माहीत. शिवाय, गृहिणी हाेणे हा त्यांचा वैय्नितक निर्णय असल्याने त्यात काेणी मतप्रदर्शन करण्याची गरज नाही. तरीही लाेक शेरेबाजी करतात. गृहिणी हाेऊन तिने काही चूक केल्यासारखे लाेक बाेलतात. हे अगदी अयाेग्य आहे. याला वैतागलेली एक गृहिणी काय म्हणते ते पाहा.ती म्हणते, ‘गृहिणी कायम रिकाम्या असतात, त्यांना वेळच वेळ असल्याचा एक फार माेठा गैरसमज लाेकांमध्ये आहे.
टीव्हीवरील दैनंदिन मालिका पाहणे आणि शेजारणींबराेबर गाॅसिपिंग करणे एवढेच काम गृहिणी दिवसभरात करतात असेही अनेकांना वाटते. माझी आईसुद्धा गृहिणी हाेती आणि मी तिला दिवसभर कधी निवांत बसलेली पाहिलेली नाही. त्या काळात कामांसाठी घरेलू कामगारांची सेवा घेतली जात नसल्याने गृहिणीवरच बाेजा पडत असे. ती पहाटेपासून रात्रीपर्यंत सदैव कामांमध्ये गुंतलेली असे. माझी आई स्वयंपाक करण्यात कुशल असल्याने ती दरराेज नवीन पदार्थ बनवायची आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या भाज्या काळजीपूर्वक निवडायची. माझे वडील भाज्या सुबकपणे चिरण्यात वाकबगार हाेते आणि वेळ मिळाला की आईला मदत करत असत.सदैव कामांत राहिल्याने वयाच्या सत्तराव्या वर्षातही आईचे आराेग्य चांगले आहे.’ बहुदा आईचा आदर्श घेऊन या महिलेनेही गृहिणी बनणे पसंत केले असावे.
ती म्हणते, ‘माझ्या मदतीला घरेलू कामगार आहेत आणि मी टीव्हीसुद्धा पाहते. मात्र, मालिका न बघता चित्रपट पाहणे मला आवडते.तथापि, याचा अर्थ मी दिवसभर रिकामी असते असे नाही.माझा दिवसही कामांमध्ये बांधलेला असताे. मला माझ्या सासू-सासऱ्यांची काळजी घ्यावी लागते, त्यांना दवाखान्यात न्यावे लागते, घरातील कामे करावयाची असतात, वीजविषयक, पाण्याच्या नळांच्या दुरुस्त्यांची कामे मलाच करावी लागतात, दुचाकी वाहन सर्व्हिसिंगला न्यावे लागते, पती-मुलाच्या वेळा सांभाळाव्या लागतात. हे सगळे करण्यात माझा दिवस कधीच संपून जाताे.’ गृहिणी असण्याबाबत आणखीही काही गैरसमज असतात. एक महिला तिच्या मुलाने दहावीत मिळविलेल्या ग्रेडबाबत मैत्रिणीबराेबर चर्चा करत हाेती. मुलाला फार चांगली ग्रेड मिळाली नसल्याचे या महिलेचे मत हाेते. त्यावर ‘तू दिवसभर घरीच असतेस, तर त्याचा अभ्यास का घेत नाहीस?
मुलगा अभ्यास करत असताना तू त्याच्या शेजारी बसत जा, त्याला मदत कर,’ असा सल्ला या मैत्रिणीने दिला. म्हणजे, एखादी आई गृहिणी असेल, तर तिच्या मुलाला चांगल्या ग्रेड मिळायला हव्यात अशी अपेक्षा दिसते. तशा ग्रेड मिळाल्या नाहीत, तर ती आई म्हणून कमी पडत असल्याचा निष्कर्षही काढला जाताे. ही महिला मुलाकडे (किंवा मुलीकडे) लक्ष देण्याऐवजी वेळ वाया घालवित असल्याचा समजही दिसताे. अन्य एका गृहिणीच्या शेजारणीला एक नवीन साॅफ्टवेअर तयार करण्यासाठी काेणाची तरी मदत हवी हाेती. (अर्थात ती माेफत अपेक्षित हाेती). तिच्या एका ‘प्रभावशाली’ राजकीय मित्रासाठी हे साॅफ्टवेअर या शेजारणीला तयार करून हवे हाेते.या गृहिणीने या कामासाठी आपल्याला वेळ नसल्याचे सांगितल्यावर शेजारणीची प्रतिक्रिया वेगळीच हाेती. ‘तू घरीच असतेस (म्हणजे तुला नाेकरी नाही) तुझे प्राेग्रामिंगचे काैशल्य वापरण्याची ही संधी कशाला वाया घालवतेस?
तू तुझा माेकळा वेळ (म्हणजे सगळा दिवस) सत्कारणी लाव,’ असे ही शेजारीण सांगत हाेती. या प्रतिक्रेयेचा सारांश माेज्नया शब्दांत सांगावयाचा, तर ही गृहिणी आर्थिकदृष्ट्या असुरक्षित (पतीच्या पैशांवर जगणारी) आहे आणि ती गृहिणी असल्याने दिवसभर माेकळी असते. वेळ वाया घालविण्यापेक्षा आपले काैशल्य वापरून काेणतेही मूल्य न घेता तिने काम करावे असे ही शेजारीण सांगत हाेती. नाेकरी साेडून गृहिणी झालेल्या महिलांना तर अनेक टाेमणे आणि सल्ल्यांना सामाेरे जावे लागते. अशीच एक गृहिणी म्हणते, की मी आता सामाजिक समारंभांना जाणे टाळते आणि गेले(च) तर ज्येष्ठांपासून लांब राहते. कारण, हे लाेक माेफत सल्ले देण्यास कायम तयार असतात. ‘तू नाेकरी साेडलीस हे चांगले झाले. आता विश्रांती घे (म्हणजे दिवसभर झाेप काढ किंवा टीव्ही बघत बस).