सायबर गुन्हेगार करतात प्रामुख्याने पाच मार्गांनी फसवणूक

    22-Aug-2024
Total Views |
 
 


cyber
 
 
 
सध्याच्या आधुनिक जगात गुन्हेगारीचा मार्ग बदलला असून, सायबर गुन्हे वाढायला लागले आहेत. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लांब राहून गुन्हेगार आपला खिसा रिकामा करतात.सायबर गुन्ह्यांच्या निपटाऱ्यासाठी मुंबई पाेलिसांनी सुरू केलेल्या 1930 या क्रमांकाच्या सायबर हेल्पलाइनवर दरराेज असंख्य तक्रारी नाेंदविल्या जातात. हे गुन्हेगार काेणत्या पद्धती वापरतात याचा तपास केल्यावर मुंबईत पाच प्रकार प्रामुख्याने वापरले जात असल्याचे पाेलिसांना आढळले.त्यात स्टाॅक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक, अर्धवेळ काम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक, खाेटी अटक, डिजिटल अरेस्ट आणि डीपफेक पद्धतीने फसवणूक या त्या पाच पद्धती आहेत. संशयास्पद घटनांपासून सावध राहण्याचे आणि असे काही घडल्यास त्वरित पाेलिसांबराेबर संपर्क साधण्याचे आवाहन सायबर विभागाने केले आहे. ‘सायबर गुन्हेगारीची माहिती देण्यासाठी आम्ही नियमित कार्यक्रम घेताे, तसेच मार्गदर्शक तत्त्वेही जारी करताे,’ अशी माहिती सायबर सेलचे पाेलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.सायबर गुन्हेगारीचे मुख्य पाच प्रकार आणि ते करण्याची पद्धत जाणून घ्या.
 
1. स्टाॅक मार्केट फसवणूक साेशल मीडियावरील व्हाॅट्सअ‍ॅप, टेलिग्राम आदी प्लॅटफाॅर्म्सचा वापर करून गुन्हेगार लाइव्ह ब्राॅडकास्ट करतात. आपण सरकारमान्य फाॅरिन पाेर्टफाेलियाे इन्व्हेस्टमेंट फर्मचे भागीदार असल्याची बतावणी करून हे गुन्हेगार एखाद्या व्यक्तीला एक अ‍ॅप डाउनलाेड करण्यास सांगतात.शेअरची खरेदी करणे आणि अन्य व्यवहारांसाठी हे अ‍ॅप डाउनलाेड करण्यास सांगितले जाते.बनावट ओळख वापरून घेतलेल्या नंबरवरून हे उद्याेग केले जातात.
 
गुन्ह्याची पद्धत
 
 फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा साेशल मीडियाच्या अन्य प्लॅटफाॅर्मवरून बळींना व्हाॅट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड केले जाते.
 विश्वास संपादन करण्यासाठी गुन्हेगार स्टाॅ्नस अथवा आयपीओतील गुंतवणुकीबाबत ऑनलाइन ्नलासेस घेतात.
 ट्रेडिंग अ‍ॅप्स/एपीके फाइल्स गुगल प्ले स्टाेअरवरून डाउनलाेड करण्यास बळींना सांगितले जाते.
 बळींना प्राथमिक रक्कम भरण्यास वा खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले जाते.
 एकदा पैसे दिले, की गुन्हेगार निधी गाेठवितात, अ‍ॅ्नसेस बंद करतात.
 फसवणूक झालेल्यांना पैसे परत मिळू शकत नाहीत.
 
2. अर्धवेळ नाेकरी किंवा टेलिग्रामवरील टास्क स्कॅम टेलिग्रामच्या माध्यमातून अर्धवेळ नाेकरीच्या शाेधात असलेल्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढते आहे. जास्त उत्पन्न मिळवू इच्छित असलेल्यांची ‘फिशिंग’च्या माध्यमातून लूट केली जाते.विद्यार्थी, गृहिणी आणि बेराेजगारांची फसवणूक यात जास्त प्रमाणात हाेते.
 
गुन्ह्याची पद्धत
 
 संबंधितांना चांगल्या पगाराचे आमिष दाखवून भुलविले जाते. त्यासाठी साेशल मीडिया, एसएमएस, व्हाॅट्सअ‍ॅप ग्रुप किंवा टेलिग्रामद्वारे ही आश्वासने दिली जातात साेशल मीडियावरील इन्फ्ल्युएन्सर्सचे व्हिडिओ त्यासाठी दाखविले जातात. गुगल प्ले स्टाेअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टाेअरवरून अ‍ॅप डाउनलाेड करण्यास सांगितले जाते.
 बळींना त्यांच्या गुंतवणुकीवर दाेनशे टक्के परताव्याचे आमिष दाखविले जाते.
 प्रारंभी बळींना त्यांच्या गुंतवणुकीतील पहिली रक्कम काढता येते. नंतर मात्र त्यांना वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगितले जाते आणि ते जाळ्यात फसत जातात. अखेर गुन्हेगार प्रतिसाद देणे बंद करून गायब हाेतात.
 
3. खाेटी अटक (फेक अ‍ॅरेस्ट) कायदेशीर अडचणींची भीती दाखवून गुन्हेगार या मार्गाने लाेकांची फसवणूक करतात.
 
गुन्ह्याची पद्धत
 
 खाेटा कलर आयडी वापरून गुन्हेगार आपण कायद्याच्या अंमलबजावणीच्या क्षेत्रातील असल्याचे भासवून काॅल करतात किंवा ई-मेल पाठवितात.
 संबंधितांनी मनी लाॅड्रिंग वा अमली पदार्थांच्या वाहतुकीसारखे गुन्हे केल्याची बातवणी करून गुन्हेगार खाेटे पुरावे दाखवितात.
 तुमच्या नावाने अटकेचे वाॅरंट निघाले असून, त्वरित कृतीची गरज असल्याचे सांगितले जाते.