ईव्ही बॅटरी क्षमतावाढीसाठी पुण्यातील प्रा. गणेश लोहार यांचे यशस्वी संशोधन

    14-Aug-2024
Total Views |
 
ev
 
पुणे, 13 ऑगस्ट (आ.प्र.) :
 
सध्याच्या काळात उपयुक्त अशा इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या (ईव्ही) बॅटरीशी निगडित वायरलेस बॅटरी मॅनेजमेंट सिस्टमवर (डब्ल्यूबीएमएस) संशोधन करत नाशिकच्या संदीप विद्यापीठातून प्रा. गणेश लोहार यांनी पीएचडी मिळवली. त्यांच्या या कामामुळे ईव्हीची परफॉर्मन्स व कार्यक्षमता वाढणार असून, याचा ईव्ही वाहनक्षेत्राला मोठा फायदा होणार आहे. प्रा. लोहार सध्या सिंबायोसिस स्किल्स विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ईव्ही बॅटरीच्या रिअल-टाइममध्ये स्टेट ऑफ चार्ज (एसओसी) आणि स्टेट ऑफ हेल्थ (एसओएच) व सेफ्टीवर उपयुक्त संशोधन करून ते वायरलेसरित्या कसे पाठवता येईल व बॅटरीचे आयुष्य कसे वाढेल, यावर काम केले आहे.
 
संदीप विद्यापीठातील परीक्षकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले असून, या विषयावर पेटंटसाठी अर्ज करण्यास त्यांना प्रोत्साहित केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेंद्र सिन्हा यांनी यांनी प्रा. लोहार यांचा सत्कार केला. प्रा. लोहार यांना डॉ. मोर्धा सुरेशकुमार यांनी मार्गदर्शन केले. इलेक्ट्रिक वाहने आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रणालींसारख्या शाश्वत ऊर्जा उपायांच्या शोधात एसओसी आणि एसओएचचा अचूक अंदाज लावण्यास सक्षम प्रगत बॅटरी व्यवस्थापन प्रणाली (बीएमएस) विकसित करणे आवश्यक आहे. कोअर बॅटरी पॅरामीटर्सचे मापन आणि नियंत्रण सुधारून बीएमएसचे महत्त्व गेल्या दशकांमध्ये दाखवले गेले आहे.