शासनाच्या वतीने कौशल्याधारितप्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे पुण्यात केंद्र

01 Aug 2024 14:10:47
 
 
sh
मुंबई, 31 जुलै (आ.प्र.) :
 
पुण्यात कौशल्यावर आधारित प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे केंद्र स्थापन करण्यासाठी राज्य शासन आणि एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या कराराचा लाभ राज्यातील युवकांना देशात व परदेशांत रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक प्रमोद नाईक, सचिव स्मिता गाडे, एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेदमणी तिवारी, एनएसडीसी इंटरनॅशनल कंपनीचे सल्लागार संदीप कौरा, उपाध्यक्ष नितीन कपूर, राष्ट्रीय कौशल्य विकासचे प्रमुख मोहंमद कलाम व सर्व विभागांचे प्रधान सचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
जगभरात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी देशातील युवकांना प्राप्त होण्याच्या दृष्टीने केंद्राच्या कौशल्य विकास व उद्यमशिलता मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या रोजगार संधींच्या अनुषंगाने एनएसडीसी इंटरनॅशनल लिमिटेडकडून कौशल्याधारित अभ्यासक्रम राबवण्यात येतात. राज्यात हे अभ्यासक्रम राबवण्यासाठी एनएसडीसी इंटरनॅशनलसोबत हा करार करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0