पायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका

    09-Jul-2024
Total Views |
 
 

health 
 
का हाेताे हा आजार पायांच्या शिरांमध्ये अडथळा आल्यामुळे हा आजार हाेऊ शकताे.शिरांमध्ये चरबी साचल्यामुळे त्या एवढ्या संकुचित हाेता की यातून रक्तपुरवठ्यात अडथळा येऊ लागताे. ज्यामुळे वेदना व इतर समस्या निर्माण हाेतात. व्हॅस््नयुलर समस्यांची अनेक लक्षणे असतात. उदा.चालण्यामुळे हाेणाऱ्या पायांतील वेदना आराम केल्यास कमी हाेतात. पाय लटकवल्याने वा वर ठेवल्यास वेदना हाेतात व जागा बदल्ल्याने आराम मिळताे.अशावेळी पाय लटकवून ठेवल्यामुळे पाय गडद रंगाचे हाेतात. व वर केल्यास पिवळे पडतात. रुग्णाच्या पायाची नखे जाड व निळी पडतात. रुग्णाच्या पाय व तळपायांचा रंग बदलताे. रुग्णाच्या बाेटांमध्ये व पायाच्या बाहेरील भागात जखमाही हाेऊ शकतात. जर पायांची बाेटे, पाय व मांड्यांवर केस नसतील तरी व्यक्ती व्हॅस््नयुलर समस्येनी ग्रस्त असू शकते.
 
काय असते कारण विशेषज्ञांच्या मते पाय दुखण्याची तशी अनेक कारणे असू शकतात पण जर पाय सतत एवढे दुखत असतील की आप रात्री झाेपूही शकत नसाल तर आपल्याला पाय गमावण्याचा धाेका असू शकताे. अशा स्थितीत त्वरित व्हॅम््नयुलरडाॅ्नटरांना भेटायला हवे. रुग्णाच्या पायांच्या शिरांमध्ये काेठे रक्तप्रवाहात अडथळा येत आहे हे कळण्यासाठी पायांच्या शिरांचे रंगीत डाप्लर वा अल्ट्रासाउंड केले जाते. दुसरी टेस्ट ऑपरेशनपूर्वी अँजियाेग्राफीद्वारे केली जाते. हे एक विस्तृत तंत्र असून ज्यामुळे शिरांची अंतर्गत स्थिती स्पष्ट हाेते आणि याेग्य उपचाराद्वारे पाय दीर्घकाळ चांगले बनवता येऊ शकतात.कसे करावेत उपचार ? सामान्यशल्यउपचारासाठी रुग्णाला एक-दाेन दिवसच हाॅस्पिटलमध्ये राहावे लागते.
 
या तंत्राला अँजियाेप्लास्टी म्हणतात. यात शिरांना फुग्यासारखे रुंद ककेले जाते. यासाठी एक पातळ तार कंबर व हातांतून प्रभावित ठिकाणी पाठवली जाते. ज्याद्वारे फुगा पाठवला जाताे. जाे शिरा रुंद करताे. अडथळा दूर झाल्यानंतर स्टीलचा पाइप लावून दिला जाताे. ज्यामुळे ती जागा पुन्हा संकुचित हाेत नाही. या तंत्राने दीर्घकाळ दुखण्यापासून आराम मिळताे.बायपास शस्त्रक्रिया व्हॅस््नयुलर समस्येच्या उपचाराची दुसरी पद्धत बायपास शल्य उपचार आहे.यासाठी रुग्णाला 7-10 दिवस हाॅस्पिटलमध्ये राहावे लागू शकते. व्हॅस््नयुलर हृदयाच्या बायपाससारखेच असते. यात ओरटासारखी प्रणाली 20 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी उपयुक्त ठरू शकते तर कंबरेखालील शिरांसाठी 10- 15 वर्षांसाठी हे तंत्र उपयुक्त ठरू शकते. या काळात पायांमध्ये रक्तप्रवाह सामान्य हाेताे.