गोखले संस्थेच्या कुलपतिपदीज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विवेक देबरॉय

    09-Jul-2024
Total Views |
 
go
 
पुणे, 8 जुलै (आ.प्र.) :
 
 गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलपतिपदी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. बिबेक देबरॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, ते नीती आयोगाचेही ते सदस्य होते. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था ही देशातील नामांकित शिक्षण संस्था आहे. या संस्थेला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला आहे.
 
अर्थशास्त्र, आर्थिक धोरणे, शासकीय योजना, विविध प्रकारची सर्वे क्षणे यात गोखले संस्थेचे महत्त्वाचे योगदान दिले जाते. डॉ. देबरॉय 1983-87 या कालावधीत गोखले संस्थेत कार्यरत होते. सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च आणि नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (एनसीएईआर) अशा अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. अर्थशास्त्र आणि धोरण तयार करणे या क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. रिसर्च पेपर आणि भाषांतराच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रातही मोठे काम केले आहे. त्यांना 2015 मध्ये पद्माश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याशिवाय भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतर्फे सर आर. जी. भांडारकर स्मृती पुरस्काराचेही ते मानकरी आहेत. यापूर्वी त्यांनी भारतीय सांख्यिकी संस्थेचे अध्यक्ष, डेक्कन कॉलेजचे कुलपती अशा अनेक जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत.