एकाच वेळी वेगवेगळी कामे केल्याने मुलांवर हाेताे दुष्परिणाम

    08-Jul-2024
Total Views |
 
 

Child 
 
प्रत्येक माता-पिता आपल्या मुलांना परेक्ट बनवू इच्छित असतात.मुलाने अभ्यास तर चांगला करावाच, शिवाय खेळात व क्रिएटिव्ह कामातही रुची घ्यावी, असे त्यांना वाटत असते.त्यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्न करीत असतात व मुलांना सुपर ह्यूमन बनवू लागतात. मुलांवर याचा दुष्परिणाम हाेऊ लागताे व मुलांच्या शिक्षण व व्यवहारात निगेटिव्ह बदल हाेऊ लागताे.
 
अभ्यासात मन कमी लागणे : अनेक कामे एकाच वेळी करण्याच्या प्रयत्नात मुलांचे लक्ष अभ्यासावरून उडू लागते. अशा वेळी काेणते काम आधी करावे व काेणते काम नंतर हे त्यांना समजेनासे हाेते.यामुळे कन्फ्यूज हाेऊन त्यांचे चांगले कामही बिघडू लागते.
 
लवकर निराश व दु:खी हाेणे : मूल जेव्हा मल्टिटास्क करीत असते तेव्हा भराभर कामे करण्यामुळे चुका हाेऊ लागतात. ज्यामुळे ते निराश हाेते व बऱ्याचदा डिप्रेशनचेही शिकार हाेत असते.
 
पालक व मुलांमध्ये दुरावा वाढणे : मल्टिटास्क हाेण्यामुळे मूल एक राेबाेटप्रमाणे भराभर काम करते व यामुळे मुलात इमाेशनल डेव्हलपमेंट कमी हाेऊ लागते. यामुळे पालक व मुलात दुरावा वाढत जाताे.
 
करिअरबाबत कन्फ्यूज हाेणे : जसजसे मूल अ‍ॅक्टिव्हिटीत उत्तम करू लागते तेव्हा पालक त्रस्त हाेतात व प्रयत्न करतात की, मुलाने त्यात जास्त वेळ न देता फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यावे. या गाेष्टींचा मुलांच्या मेंदूवरही परिणाम हाेताे व ती आपल्या भविष्याबाबत कन्फ्यूज राहू लागतात.
 
काय करावे पालकांनी : मुलांना काेणताही हाॅबी काेर्स लावण्यापूर्वी प्रथम शिक्षक वा काउंसलरचा सल्ला घ्यायला हवा.मुलाला एक वा दाेन अ‍ॅक्टिव्हिटीतच टाकावे. पराॅर्म करण्याचे प्रेशर टाकू नये. टाइम व काम मॅनेज करायला शिकवावे.